जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेत अ.ए.सो.चे अध्यापक विद्यालयाचे सुयश
नगर : दर्शक ।
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (संगमनेर) वतीने जिल्हयातील सर्व अध्यापक विद्यालयासाठी (डी.एल.एड.) जिल्हांतर्गत क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पाउलबुद्धे कॉलेज येथे संपन्न झाला. या कार्याक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर साहेब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवा संस्थेचे देशमुख सर व डाएट चे जेष्ठ अधिव्याख्याता श्री. लक्ष्मण सुपे साहेब, तसेच अधिव्याख्याता श्री. मुकुंद दहिफळे साहेब, सांख्यिकी सहाय्यक श्री. नितीन टिळेकर सर आदि उपस्थित होते.
अध्यापक विद्यालयातील या स्पर्धांसाठी क्रिडा अध्यापक श्री. उपासणी एम.एस., सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. बालटे ए.एम. यांनी कामकाज पाहिले. अ.ए. सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व सर्व मान्यवर पदाधिका-यांचे या कामासाठी मार्गदर्शन मिळाले. यापुढेही आपली प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. राजेश बनकर साहेब म्हणाले की, कला व क्रिडा या दोन्ही बाजू माणसाला नव चैतन्य देत असतात. भावी शिक्षक हा शरीराने व मनाने सक्षम असला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या अंगी एखादी तरी कला जोपासली पाहिजे. या कार्यक्रमाचे आभार श्री. अन्नदाते सर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी श्री. सचिन शिंदे सर अ.ए.सो. चे श्री. मंगेश उपासनी सर व यशवंतराव गाड़े अध्यापक विद्यालयाचे श्री. साठे सर व सर्व प्राचार्य यांनी यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी आपल्या शुभेच्छा संदेशात श्री. सुपे साहेब ज्येष्ठ अधिव्यख्यता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे यांनी सर्व छात्राध्यापकानी अनेक क्षेत्रात प्रगति करावी व आपल्या व्यक्तिमात्वात भर टाकावी असे सूचित केले, याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य व अध्यापकचार्य उपस्थित होते.
यावेळी आपल्या उत्कृष्ट क्रीडा नियोजन व स्पर्धा नियोजनासाठी मार्गदर्शक म्हणून कामकाज पाहिलेले प्राचार्य व अध्यापक यांचा सन्मान प्राचार्य डॉ. राजेश बनकर साहेब यांनी केला. अहमदनगर जिल्हांतर्गत अध्यापक विद्यालय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अ.ए. सोसायटीच्या अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये सांघिक व सांस्कृतिक प्रकारात विविध बक्षीसे पटकावली. सर्व जिल्हयातील अध्यापक विद्यालयांमध्ये अ.ए. सोसायटी अध्यापक विद्यालयाने पुढील स्पर्धामध्ये चकमदार कामगिरी केली. अध्यापक प्रथम क्रमांक, समूहगीत उत्तेजनार्थ तसेच थ्रो विद्यालयाच्या शै. साहित्य स्पर्धा प्रथम क्रमांक, पोस्टर स्पर्धा स्पर्धा- द्वितीय क्रमांक, रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ, निबंध स्पर्धा बॉल मूले – तृतीय क्रमांक मिळवला. यासाठी प्रेरणा अ.ए. सोसायटीच्या सन्मा. प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया मॅडम यांनी प्रेरणा दिली. व शाला समिती चेअरमन श्री. प्रकाशजी गांधी साहेब, संस्था विश्वस्त व शाला समिती सदस्य अॅड. श्री. गौरवजी मिरीकर सर व संस्था सल्लागार मंडळ सदस्य व शाला समिती सदस्य श्री. भूषण भंडारी सर या सर्वांनी मुलांचे मनापासून अभिनंदन केले.
प्राचार्य श्री. संदीप उबाळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. तर क्रिडा अध्यापक श्री. मंगेश उपासनी सर आणि सर्व अध्यापक यांनी मुलांचा सराव करुन घेतला. तसेच या स्पर्धासाठी अध्यापक विद्यालयातील श्री. काटे एस.एम., श्री. म्हस्के पी.के., श्रीमती. परदेशी एस.एस., श्रीमती. कुंभार एस.बी. श्रीमती. झांबरे एस.एस., श्रीमती. साळवे ए.व्ही., यांचे सहकार्य लाभले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर साहेब व तसेच श्री. सुपे साहेब ज्येष्ठ अधिव्यख्यता व स्पर्धा व्यव्स्थापक श्री. मुकुंद दहिफळे साहेब यांनी तसेच स्पर्धा नियोजक व देखरेख साठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सांखिकी विभाग प्रमुख श्री. नितिन टिळेकर साहेब यांनी श्री. उपासनी सर यांचे कौतुक केले.
अ.ए.सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह मा. श्रीम. छायाताई फिरोदिया व सर्व मान्यवर पदाधिका-यांचे या कामासाठी मार्गदर्शन मिळाले. सर्वानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
