आर्ट ऑफ लिव्हिंग चा महाशिवरात्री महोत्सव संपन्न
नगर : दर्शक ।
नगर-आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर शाखेतर्फे दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्वरूपात यंदाही महाशिवरात्री महोत्सव साजरा केला गेला. अहिल्यानगर शाखेचे रुद्राभिषेक व रूद्रपुजा आयोजित करण्याचे सलग 21 वे वर्ष आहे. विश्र्वशांती चा महान संदेश देत संपूर्ण भारतात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे रुद्राभिषेक व रूद्रपुजेचे आयोजन करण्यात येते.
या शुभदिनी नवनिर्वाचित महापौर ज्योती ताई गाडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी महापौरांचा बंगलोर आश्रमातील ऋषीजी, व स्वामीजी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर च्या गावडे मळा येथील ध्यान मंदिरात आयोजित महारूद्रपुजा व महारूद्राभिषेकाचा अहिल्यानगर शहरातील चारशे नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया ताई जानवे तसेच वॉर्ड मधील नवीन नगरसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला. शारदाताई ढवन, संपत दादा बारस्कर, दिपाली ताई बारस्कर, बाळासाहेब पवार, ऋग्वेद गंधे,संध्याताई पवार, रोशनी ताई त्रिंबके,निखिल वारे, सचिन हरिदास कुसळकर, सुनील त्रंबके हे सर्व नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते.
सर्वच मान्यवरांनी संपूर्ण पुजेचा आनंद घेत महादेवाचे आशिर्वाद घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे वीडीएस कोऑर्डिनेटर चंद्रकांत तागड, जिल्हा शिक्षक समन्वयक डॉ सुपर्णा देशमुख, योगा कोऑर्डिनेटर पद्माकर कुलकर्णी, टीओके कमिटी चे राजेंद्र पाचे, घनश्याम दळवी, अर्चना दौंड, जयश्री गिरवलकर यांनी परिश्रम घेतले
.webp)
.webp)