लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न

 लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न 

लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न


नगर |  

येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबाद प्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     याप्रसंगी समाजातील बंधू-भगिनी व परिसरातील हरी ॐ भजनी मंडळातील भगिनीनी कोजागिरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे विठ्ठल रुक्मिणी नरहरी महाराज, लक्ष्मीनारायण श्री स्वामी समर्थ मूर्तीस पहाटेच काकड आरती, 

पूजाअर्चा, भजन, रोज नित्यनियमाने हरीॐ भजनी मंडळातील  भगिनी सौ.छाया लखारा, सौ.सुनिता कुलट,मंगल डागवाले, सगिता बेरड,सुमन मोकाटे,सिंधू  सुडके ,शालिनी राठौर,लिलाव शहरकर,वंदना शहरकर, वनिता शहरकर, सुशीला रत्नापूरकर, दिपाली लखारा यानी अत्यंत मनमोहक आकषॅक रेखीव रांगोळी काढली.

       याप्रसंगी अध्यक्ष संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, शरद कुलथे,किशोर शहरकर, व समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून दीपोत्सवाची शोभा वाढवली.

         सालाबाद प्रमाणे हरी ॐभजनी मंडळातील भगिनी कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटेच श्री विठ्ठल रुक्मिणी, श्रीनरहरी महाराज सोनार लक्ष्मीनारायण, श्री महादेव ,श्री स्वामी समर्थ यांची काकड आरती करून भक्तिमय प्रसन्न  वातावरण निर्माण करतात.आज सवॅ मूर्तीना लोण्याचा पोशाख करण्यात आला होता व तसेच देव दिपावली निमित्त अन्नकोट करण्यात आला.