लॉयर्स सोसायटीच्या चेअरमनपदी भूषण बर्‍हाटे व उपाध्यक्षपदी हाफिज जहागीरदार

अहमदनगर | प्रतिनिधी -अहमदनगर लॉयर्स सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.पी.आळकुटे यांनी नूतन संचालक मंडळाची घोषणा केली. नूतन संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत लॉयर्स सोसायटीच्या  चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली. यामध्ये चेअरमन पदासाठी अ‍ॅड.भुषण बर्‍हाटे व संदीप काळे यांच्या सरळ लढत झाली. यात अ‍ॅड. बर्‍हाटे यांनी अ‍ॅड.काळे यांच्यावर ९ विरोधात ३ असा एकतर्फी विजय मिळवला.


तसेच व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीतही अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांनी अ‍ॅड.चंदन बारटक्के यांच्यावर ९ विरोधात ३ मतांनी विजय मिळवला.

यावेळी लॉयर्स सोसायटीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.यावेळी लॉयर्स सोसायटीचे नूतन संचालक लक्ष्मण कचरे, रावसाहेब बर्डे, नामदेव वाकळे, संदीपकुमार पाखरे, वृषाली तांदळे, अनिता दिघे, विनायक सांगळे आदींसह मावळते अध्यक्ष अ‍ॅड.नानासाहेब पादीर, उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रभाकर शहाणे, सचिव अ‍ॅड.रफिक बेग, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, विशेष सरकारी
वकील सुरेश लगड आदींसह वकील उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष अ‍ॅड.भुषण बर्‍हाटे म्हणाले, लॉयर्स सोसायटीचे सदस्य असलेल्या सर्व वकील बंधू भगिनींनी माझ्यावर मोठ्या विश्वास व्यक्त करत अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. या विश्वासास पात्र राहत सर्वांना बरोबर घेत काम करणार आहे. लॉयर्स सोसायटीचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहे.

नूतन व्हाईस चेअरमन अ‍ॅड.हाफिज जहागीरदार यांनी सर्वांचेआभार मानले. यावेळी माजी सोसायटीचे संचालक सुधीर टोकेकर, रवींद्र शितोळे, सविता साठे, अरविंद मुळे, असिंसह वकील उपस्थित होते.