व्ही केअर वेल्फेअर चा “मनकर्णिका 2024” पुरस्कार सौ.श्रुती मनवेलीकर यांना प्रदान

 व्ही केअर वेल्फेअर चा “मनकर्णिका 2024” पुरस्कार सौ.श्रुती मनवेलीकर यांना प्रदान

व्ही केअर वेल्फेअर चा "मनकर्णिका 2024" पुरस्कार सौ.श्रुती मनवेलीकर यांना प्रदान






अहमदनगर – महिलांचे सबलीकरण, उद्योगातून रोजगार निर्मिती व त्यांना स स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर करण्याच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन मुंबईच्या वतीने देण्यात येणारा “मनकर्णिका 2024 “अंतर्गत अंथोप्रनर ऑफ इयर”हा मानाचा पुरस्कार नगरच्या सुरभी ब्युटी अँड हेअर सलून च्या संचालिका सौ श्रुती विक्रांत मनवेलीकर यांना मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 



मुंबई येथील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या सोहळ्याप्रसंगी पद्मश्री डॉ. कल्पना सरोज यांच्या हस्ते तसेच व्ही केअर चे अध्यक्ष तुषार रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान श्रुती मनवेलीकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सौ भविष्या बुद्धदेव ,प्रो अस्मिता दौडा, सौ कपिला सोनी, सौ मंजू लोढा आधी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत्या. 


            सौ श्रुती मनवेलीकर या गेली 20 वर्ष सूर्भी ब्युटी अँड हेअर सलोन च्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.नगर शहर आणि उपनगरात 3 सेंटर च्या माध्यमातून गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण ,त्यांच्या उद्योगासाठी प्रोत्साहन देणे ,मार्गदर्शन आणि त्यांचे सबलीकरण करणे यासाठी सातत्यपूर्ण कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विषयात विविध पदव्या संपादन केल्या आहेत 



तसेच स्वित्झर्लंड येथील विद्यापीठात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदवी घेतली आहे .त्यांना महिला सबलीकरणासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे या पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे. यापुढेही महिलांच्या प्रशिक्षण आणि रोजगार यासाठी आपण सातत्यपूर्ण कार्यरत राहू असा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रुती मनोविकर यांचे अभिनंदन केले आहे.