शंकर सावली मठात हनुमान चालीसा संपन्न

 शंकर सावली मठात  हनुमान चालीसा संपन्न 

शंकर सावली मठात  हनुमान चालीसा संपन्न



         अहमदनगर (प्रतिनिधी) –  माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीतील शंकर सावली मठात शंकर महाराजांच्या ७७ वा समाधी सोहळ्या निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये  श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट प्रस्तुत हनुमान चालीसा व भजनसंध्या कार्यक्रम संपन्न झाला

  

   मठासमोर  आयोजलेल्या या  सामुहिक हनुमान चालीसा पाठ संपन्न झाली व भजन संध्याने शंकर महाराजांच्या  नामाने परिसर  दुमदुमन गेला होता यावेळी हनुमान चालीसाच्या  गायनाने कार्यक्रमात रंगला .तर भाविकांनी  सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व भजन संध्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध देवतांची स्तुतीपर भजने संपन्न झाली 


           या  कार्यक्रमास मोठ्या संख्नेने शंकर भक्त ,परिसरातील भाविक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय नेते,कार्यकर्तेनागरिक उपस्थित होते हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व  भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली 


          ४ दिवसीय या कार्यक्रमात सामुदायिक शंकर गिता पारायण सोहळासंपन्न झाला दुसऱ्या समाधी दिनी पालखी छबिना सोहळा होणार असून गुरुवारी संध्याकाळी महाप्रसाद म्हणून आगडगाव ची आमटी व भाकर चे जेवण ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे