सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून युवती, महिलांना महिला सुरक्षा ॲप मोफत भेट – निखिल वारे
नगर-आज महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आणि संवदेनशील बनला आहे. आपल्या घरातील तसेच परिसरातील मुली, महिला सुरक्षित राहणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.
या भावनेतून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज माझ्या संकल्पनेतून लाडक्या बहिणी व जेष्ठ नागरिकांसाठी निडली सॉस हे अत्यंत प्रभावी असे मोबाइल अॅप्लिकेशन सावेडी उपनगरातील महिला, जेष्ठ नागरिक व लेडीज हॉस्टेल मधील मुली यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. हे मोबाईल अॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून इतर अप्लिकेशन सारखे त्याचा वापर महिला मुली सहज करून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
सावेडी उपनगरात नीडली सॉस या ॲप्लीकेशन चे उद्घाटन श्री. निखिल वारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी साई टेक्नो सर्विसेस चे अजित रोकडे, उपनगरातील युवती, महिला, नागरिक उपस्थित होते.
श्री. वारे पुढे म्हणाले ज्या वेळेस मुली, महिला यांना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाली तर मोबाइल मधील निडली सॉस या अॅप चा वापर केल्यास त्वरित जवळच्या चार नातेवाईक किंवा वरिष्ठ यांना सदर महिला असुरक्षित असल्याबाबतचा SMS आपोआप पाठविला जातो तसेच सदर मुलीचे लाईव्ह लोकेशन सुद्धा जाते आणि ते लोकेशन ट्रॅक करून त्या संकटग्रस्त मुली पर्यंत पोहोचता येते. तसेच तिच्या मोबाइल मध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागतो, त्यामुळे समोरील व्यक्तीला गोंधळात पाडता येते.
तसेच मोबाइल ॲप्लिकेशन मधून आजूबाजूचा व्हिडिओ रेकॉर्ड करता येणे शक्य होते. त्याचबरोबर सदर अॅपचा वापर करून सुरक्षेसाठी उपलब्ध असणाऱ्या शासनाच्या विविध हेल्पलाईनलाही संपर्क करणे शक्य होते. सदर सुविधा ही माझ्या कडून मोफत पुरविल्या जाणार असल्याचे सांगितले. अधिक माहिती देताना निखिल वारे म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करून महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले या लाडक्या बहिणींची सुरक्षितेबरोबरच नगरच्या युवती, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी देखील सुरक्षित राहावे या उद्देशाने अभिनव आयटी सोल्युशन पुणे आणि नगरचे साई टेक्नो सर्विसेस यांच्या माध्यमातून निडली सॉस हे उपयुक्त असे ॲप बनविण्यात आले आहे.
यामुळे सर्वांची सुरक्षितता राहण्यासाठी हे ॲप काम करते हे ॲप मोफत देण्यात आले असून लाडकी बहीण सुरक्षित बहीण ते ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे श्री.वारे म्हणाले यासाठी मला मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. आमदार संग्रामभैय्या जगताप आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. असे त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित युवतींनी या उपक्रमाचे स्वागत करून नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि उपनगरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे निखिल वारे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.