Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे

 Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे                   अहमदनगर(प्रतिनिधी)  – येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड पुष्पा येळवंडे  यांची शिवसेना नगर शहर महिला महिला आघाडीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र मीराताई शिंदे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी अहमदनगर यांनी दिले आहे             पत्रात  म्हटले आहे कि  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते  एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे,सचिव संजय मोरे, मनीषा कायंदे  यांच्या सुचनेनुसार,  आपली शिवसेना पक्षाच्या नगर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.             ॲड. पुष्पा येळवंडे या  सामाजिक कार्यकर्त्या असून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या रणरागिणी,केंद्रीय उपाध्यक्षा  (युनिट राज्य परिवहन महामंडळ) आहेत त्या  किरण पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दिड वर्षात राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी म्हणून कामकाज नगर मध्ये करत आहेत तसेच त्यानी महिला सबलीकरण समिती स्थापन करून गेले ३ वर्षपासून त्याचे कार्य चालू आहे             त्याच्या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख अनिल शिंदे  व बाबूशेठ  टायरवाले,संपर्कप्रमुख सचिव जाधव,ऍड उज्वला भोपळे,मीराताई शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे 

Dr.Vikhe Patil College: शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याची बांधिलकी जोपासावी – तहसिलदार अर्चना पागीरे

 डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये ‘कृषिरंग’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न      अहमदनगर (प्रतिनिधी)  – कृषी पदवीसाठी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून मेहनती असतात. ते कोणत्याही आव्हानाला  सामोरे जावू शकतात. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, चिकाटी व अथक प्रयत्न करुन उचित ध्येय साध्य करावे.  कृषी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा, फोरम, बॅकींग क्षेत्रात उपलब्ध … Read more

Ahmednagar Banks: अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशन संचालकपदी विष्णू फुलसौंदर निवड

 Ahmednagar Banks: अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशन संचालकपदी विष्णू फुलसौंदर निवड     अहमदनगर –  अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या  विष्णू फुलसौंदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नगर तालुका उपनिबंधक बी.बी.सिनारे, अधिकारी विशाल अळकुटे,  बँक्स असोसिएशनचे चेअरमन सीए गिरिष घैसास, प्रकाश राठी, आशा मिस्कन, प्रा.मेघा काळे, संजय बोरा, सिताराम झिने, संजय घुले आदि उपस्थित होते.      रिक्त असलेल्या … Read more

Ahmednagar Music: ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद

 अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद      अहमदनगर –  अहमदनगर येथील माऊली सभागृहमध्ये पार पडलेल्या ‘सोलफुल क्लासिक्स’ या अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या भव्यदिव्य संगीत कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.      कार्यक्रमाची सुरुवात अपूर्वाच्या ‘प्यार हुवा चुपकेसे’ ह्या सुमधुर गाण्याने झाली. त्यानंतर अभय जोधपूरकर यांच्या ‘जब तक जहाँ में’ या लोकप्रिय … Read more

Pune Crime: दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी अडवले सोन्याची चैन हिसकावून नेली

Pune Crime:  दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले सोन्याची चैन हिसकावून नेली  दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले. दारु पिऊन गाडी चालवतो का तुझ्यामुळे आमचा अपघात झाला असता, असे म्हणत तरुणाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने (Chain Snatching) हिसकावून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनारायण  चौकातील पुलावर घडली.  याबाबत … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय आयोजित नेक्सजेन २०२४ प्रदर्शन उत्साहात

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय आयोजित नेक्सजेन २०२४ प्रदर्शन उत्साहात  अहमदनगर– अहमदनगर महाविद‌यालयातील बी.बी.ए. विभागातर्फे नेक्सजेन – 2024 प्रदर्शन उत्साहात पार पडले. बी.बी.ए.चे विद्यार्थी दरवर्षी हे प्रदर्शन भरवितात. यंदाचे १३ वे वर्ष होते.  प्रदर्शनाचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते झाले.  प्राचार्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांनी भरविलेल्या या प्रदर्शनाचे कौतुक … Read more

Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती

 Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर येथील मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासूमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकाल मौलाना आजाद उर्दू हायस्कलमध्ये नुकताच साजरा झाला. छात्र शिक्षकांनी दैनंदिन तासिका प्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करून विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा हस्ताक्षर, निबंध, लेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वृक्षारोपन खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात … Read more

राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले – खा.सुजय विखे

 बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला … Read more

अ‍ॅड.सुषमा बडवे नोटरी पब्लिकपदी नियुक्त

 अ‍ॅड.सुषमा बडवे नोटरी पब्लिकपदी नियुक्त      अहमदनगर (प्रतिनिधी)  – अहमदनगर प्रसिध्द कायदेतज्ञ अ‍ॅड.सुषमा प्रविण बडवे यांची भारत सरकारच्यावतीने नोटरी पब्लिकपदी नियुक्ती केली.  अ‍ॅड.बडवे या अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार, महिला मंडळाच्या सदस्य आहेत.   तसेच  महिलांमध्ये कायदे विषयक जागृती करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देत आहेत. महिालांच्या प्रश्नांसाठी कायम प्रयत्नशील आहेत.      अ‍ॅड.सुषमा बडवे यांची  नोटरीपदी  निवड … Read more

जलअभियंता निकम यांना राज्य शासनाचा ‘डॉ.आंबेडकर पुरस्कार’ प्रदान

 राज्य शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार’ मनपाचे जलअभियंता परिमल निकम यांना प्रदान      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दरवर्षी दिला जाणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार’ मनपाचे जलअभियंता परिमल निकम यांना नुकताच मुंबई येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय … Read more