खा.डॉ.सुजय विखे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग 4 मध्ये जल्लोष

विकास कामांमुळे खा.सुजय विखे यांच्या विजयाची खात्री  – संगीताताई खरमाळे     अहमदनगर (प्रतिनिधी)  – खासदार डॉ.सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 4 मध्ये फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.  याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. संगीताताई खरमाळे. रामदास आंधळे, नितीन शेलार, सुजित खरमाळे, अमित गटणे,वैभव झोटींग, विनोद भिंगारे, संतोष … Read more

प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांची मोठी सोय -दत्ता सप्रे

 बोल्हेगाव परिसरातील सुमारे 26 लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  बोल्हेगाव परिसरातील अनेक कामे प्रलंबित होती, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे  पाटील यांनी या भागातील कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या कामांचा शुभारंभ होत आहे, याचे मोठे समाधान आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम … Read more

अ‍ॅड.प्रणव धर्माधिकारी नोटरी पब्लिकपदी नियुक्त

 अ‍ॅड.प्रणव धर्माधिकारी नोटरी पब्लिकपदी नियुक्त     अहमदनगर (प्रतिनिधी)  – अहमदनगरचे प्रसिध्द कायदेतज्ञ अ‍ॅड.प्रणव सुधीर धर्माधिकारी यांची भारत सरकारच्यावतीने नोटरी पब्लिकपदी नियुक्ती केली.  अ‍ॅड.धर्माधिकारी हे अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार, सनातन धर्मसभेचे कार्यकारणी सदस्य आहेत.  तसेच  भिंगार अर्बन बँकेचे माजी तज्ञ संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे .      अ‍ॅड.धर्माधिकारी यांच्या  नोटरीपदी  निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत … Read more

संस्कार, संस्कृती आणि परंपरा यांची जपवणूक म्हणजे महिलांचा सन्मान – सौ.सविता काळे

 कै.वि.ल.कुलकर्णी प्राथमिक शाळेत  माता-पालक उद्बोधन मेळावा     अहमदनगर (प्रतिनिधी)  – आई म्हणजे हक्काचा विसावा, आई म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगी, जिच्यामुळे संस्कार, संस्कृती व परंपरा यांची जपवणूक होत असते. तिचा सन्मान होणे आज काळाची गरज बनली आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांनी आपण आईमुळे घडलो असल्याचे सांगितले आहे. स्त्री ही घर, समाजाचा आधार आहे, असे प्रतिपादन सौ.सविता काळे यांनी … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी

नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी   अहमदनगर प्रतिनिधी :  अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले.  यावेळी या सर्व लढ्यात सहभागी झालेल्या समाजबांधव यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमतः माजी उपसभापती कलावती शेळके यांनी शहरातील चौकाला … Read more

Ahmednagar News: अहमदनगर शहराचे नाव बदलण्यावरून आयुक्त पंकज जावळे विरोधात मंत्रालयात शाकीर शेख यांची तक्रार दाखल

अहमदनगर शहराचे नाव बदलण्यावरून आयुक्त पंकज जावळे विरोधात मंत्रालयात शाकीर शेख यांची तक्रार दाखल अहमदनगर महानगरपालिका प्रशासक यांच्याकडील महासभा क्र. ०८ ठराव क्र. २७ सदरचा ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या तरतुदी विरोधात असल्याने निलंबित होवून विखंडित बरोबर प्रशासक श्री. पंकज जावळे यांनी अधिकार व पदाचा दुरुपयोग केल्याबाबत त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी … Read more

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी   अहमदनगरला गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा जागेवरून अनेक तर्क वितर्क सुरु होते आणि डॉ  सुजय विखेंना त्यांच्याच पक्षाचे आमदार राम शिंदे हे तिकिटासाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केलेली होती असो भाजपने पुन्हा एकदा डॉ सुजय विखे पाटील … Read more

Ward No 1 : कजबे वस्ती परिसरातील प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा राहील – शारदा ढवण

 पुण्यश्लोकनगर येथील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंत व सुशोभिकरण कामांचा शुभारंभ      अहमदनगर (प्रतिनिधी)  – गेल्या काही वर्षांपासून कजबे वस्ती परिसरात लोकवस्ती वाढत आहे, तेथील रहिवाशांसाठी लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते आदि मुलभुत सुविधा देण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरवा करुन कामे करण्यात आली आहेत. हा भाग मनपा हद्दीत येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. … Read more

Ahmednagar Music: अहमदनगरमध्ये रविवारी अपूर्वा आणि अभय यांचा ‘सोलफुल क्लासिक्स’ कार्यक्रम

 अहमदनगरमध्ये रविवारी अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांचा ‘सोलफुल क्लासिक्स’ गाण्यांचा कार्यक्रम   अहमदनगर (प्रतिनिधी)   –  अहमदनगर येथे प्रथमच पार्श्वगायक अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांचा बहारदार  गाण्यांचा कार्यक्रम रविवार 17 मार्च रोजी माऊली सभागृहात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.       अपूर्वा निषाद हिने पंडित सुरेश वाडकर, संगीतकार अशोक पत्की, डबु मलिक यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. … Read more

AAP Ahmednagar: आम आदमी पार्टी हा जनतेपुढे उत्तम पर्याय – भरत खाकाळ

 आम आदमी पार्टी च्या सभासद नोंदणीला अहमदनगरकरांचा उत्तम प्रतिसाद      अहमदनगर (प्रतिनिधी) –  आम आदमी पार्टीच्यावतीने अहमदनगर शहरात सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिल्लीगेट, श्रमिकनगर, नगर कॉलेज परिसरात या नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी  शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ, महिला अध्यक्षा अ‍ॅड.विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, नितीन लोखंडे, कला-सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष … Read more