व्यापारी मंडळाकडून दिंडीचे स्वागत व वारकर्यांना महाप्रसाद

व्यापारी मंडळाकडून दिंडीचे स्वागत व  वारकर्यांना महाप्रसाद                  अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर मध्ये  आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज आषाडी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला मार्केटयार्ड व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने फराळ  देण्यात आला व दिंडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले  गेली १२ वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली.     … Read more

Dindi: कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिंडीचे स्वागत

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने  दिंडीचे स्वागत      अहमदनगर (प्रतिनिधी) – संत निवृत्तीनाथ महाराज  पालखीचे नगरमधील बाजार समिती मध्ये आगमन झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केट कमिटीच्या वतीने मा मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करुन पालखीची पूजा, आरती करण्यात आली.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,युवा नेते अक्षय कर्डीले,  सभापती भाऊसाहेब  बोठे,उपसभापती रभाजी  सुळ, संचालक सुधिर भापकर, संजय  गिरवले, मधुकर  मगर,सुभाष भाऊ निमसे,  भाऊ  भोर, राजु  आंबेकर,मनिषा घोरपडे,आचल  सोनवणे, संतोष  म्हस्के,धर्मनाथ आव्हाड, हरीभाऊ  कर्डिले,भाऊसाहेब  ठोंबे,दत्तात्रय तापकीरे,सुप्रिया  कोतकर,राजेंद्र  बोथरा,निलेश  सातपुते आदींसह मोठ्या संख्नेने कार्यकर्ते उपस्तिथ होते.        कर्डीले यावेळी बोलताना म्हणाले वारी … Read more

Fraud Crime: अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल    अहमदनगर  :  नवी मुंबईतील एका महिलेची ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून 28 लाख 14 हजार 79 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Ahmednagar Crime: उदयनराजे पॅलेसचे कोतकर आणि यश पॅलेसचे गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

उदयनराजे पॅलेसचे सचिन कोतकर आणि यश पॅलेसचे शशिकांत गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल   अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तर हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हे दाखल झालेले गुन्हे हॉटेल संदर्भात कामगारांवरून … Read more

Social Work: स्वार्थी हेतूने होणारे समाजकार्य आणि पुण्य कार्य परमेश्वरालाही नकोय : तन्वीर चष्मावाला

 शहिद अब्दुल हमिद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम, रहमत सुलतान व मराठा सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप अहमदनगर – समाजामध्ये गरजूंना मदत करणार्यांची संख्या वाढली आहे. पण लोक मदत करणे म्हणजे उपकार समजून करायला लागले आहे. ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अलनुर आँप्टिकलचे संचालक तन्वीर चष्मावाला यांनी केले. … Read more

अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त चार्ज जोशी यांच्याकडे

 अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त चार्ज जोशी यांच्याकडे   अहमदनगर : दर्शक ।  अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त चार्ज हा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे सध्या कार्यालयात उपस्थित नसल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हा कार्यभार सोपवण्यात आल्याचे नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाख रुपयांची … Read more

रुग्णांची सेवा ही ईश्‍वर सेवा मानली तर त्यासारखे समाधान कोठेच नाही – डॉ.अभिजित होशिंग

 रुग्णांची सेवा ही ईश्‍वर सेवा मानली तर त्यासारखे समाधान कोठेच नाही – डॉ.अभिजित होशिंग      अहमदनगर (प्रतिनिधी) – दवाखान्यात येणारे रुग्ण हे विश्‍वासाने डॉक्टरांकडे येत असतात. त्यांच्या आजारावर योग्य उपयार करुन आधार देण्याचे काम प्रथम डॉक्टरांनी करावे. ‘तुम्ही पुर्ण बरे होताल, काही काळजी करण्याचे कारण नाही’ या दोन वाक्यांवर 50 टक्के रुग्ण मनाने बरा होतो … Read more

डोंगरगण येथे श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी दिंडीचे आगमन

 डोंगरगण येथे  श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी दिंडीचे आगमन         अहमदनगर (प्रतिनिधी) – मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज  १ जुलै सोमवार रोजी सायं ०६ वाजता डोंगरगण ता नगर जि अहमदनगर येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात हिरव्यागार वांबोरी  घाटात वारकरीमय वातावरणात … Read more

Dindi: विद्यार्थ्यांनी केले निवृत्तीनाथ दिंडीचे स्वागत

 विद्यार्थ्यांनी केले निवृत्तीनाथ दिंडीचे स्वागत                   अहमदनगर (प्रतिनिधी)– संतश्रेष्ठ विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज भव्य पायी  डोंगरगण  येथे आली असता पालखी सोहळाचे  स्वागत श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगण संचालित  न्यू इंग्लिश स्कूल  शाळेच्या वतीने  करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम , मा सरपंच आदर्श गांव,मांजरसुंबा, मुख्याध्यापक यशवंत भुतकर सर,विद्यार्थी शिक्षक- शिक्षकेतर वृंद, मित्र परिवार,ग्रामस्थ मोठ्या संख्नेने उपस्थित होते.  तर दिंडीत  दिंडीत  संस्थांनच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई जगताप, पालखीप्रमुख नारायण … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करुन शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली. मंगल गेट येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे कोणत्या पदाची … Read more