भूगोल विभाग व स्नेहबंध आणि अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वृक्षारोपण
अहमदनगर । दर्शक :
भूगोल विभाग व स्नेहबंध, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांचा भूगोल विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
स्नेहबंध हा प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या कल्पनेतून उदयाला आलेला उपक्रम आहे. स्नेहबंधच्या या शैक्षणिक वर्षीच्या अनुषंगाने वृक्षारोपन कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. त्या निमित्ताने भूगोल विभाग व स्नेहबंध यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी भूगोल विभाग हा महाविद्यालयात सततच वृक्षारोपन व पर्यावरण संवर्धनात अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयात स्वतंत्र जैवविविधता उद्यान तयार करून त्याचे संगोपन करण्याचे काम सर्वप्रथम भूगोल विभागाने सुरु केल्याची आठवण करून दिली.
भूगोल विभागाद्वारे सतत महाविद्यालयाचा आलेख उंचावण्यास मदत होत असून विद्यार्थीनी विभागातील सुविधांचा उपयोग करून घेवून स्वतःचे जीवन यशस्वी करून घ्यावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात भूगोल या महत्वाच्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून प्राप्त भौगोलिक ज्ञानाच्या आधारे आपले जीवन सुखकर करून घ्यावे असेही सुचविले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. नोएल पारगे, प्रो. डॉ. प्रितमकुमार बेदरकर, विनाअनुदानित विभाग प्रमुख डॉ. सय्यद रइझाक व रजिस्ट्रार पिटर चक्रनारायन उपस्थित होते. स्नेहबंध समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ. शरद बोरुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर डॉ. माधव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्नेहबंध च्या वतीने इ.टी.आय. चे समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड, डॉ. अशोक घोरपडे, डॉ. भागवत परकाळ, डॉ. पोपट शिनारे, डॉ. रविंद्र मते यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील सहाय्यक प्राध्यापक अजय काकडे, प्रा. मायाश्री मते, प्रा. अश्मिता चौहान, भूगोल विभागीतील विद्यार्थी व स्नेहबंध स्वंयसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.