Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात स्वच्छता अभियान

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात स्वच्छता अभियान


Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात स्वच्छता अभियान



Ahmednagar College:  अहमदनगर (प्रतिनिधी):  भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर महाविद्यालयामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करण्यात आले. यामध्ये ज्युनियर कॉलेजच्या ऑफिस समोरील मैदान, दर्पण कॅन्टीन, भा.पां. हिवाळे पुतळ्यासमोरील परिसर, बॉम्बे पॉईंट परिसर

या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. श्रमदानात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ रजनीश बार्नबस यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

        या कार्यक्रमाला आय. क्यू. ए. सी. समन्वयक,उपप्राचार्य डॉ प्रीतमकुमार बेदरकर, उपप्राचार्य दिलीपकुमार भालसिंग,उपप्राचार्य नोएल पारगे डॉ. रझाक सय्यद, प्रभारी रजिस्टार पीटर चक्रनारायण आदीचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पवनजीत छाबडा, डॉ. पोपट सिनारे, डॉ. रविंद्र मते,प्रा. प्रबंधिका शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.