Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. योगिता नरवडे आई एस एस परीक्षेत १३ वा क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)– केंद्रीय लोकसेवा आयोजित भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा-२०२३ मध्ये कु. योगिता अंकुरा नरवडे हिने संपूर्ण देशभरात १३ वा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. योगिता नरवडे हिने अहमदनगर महाविद्यालयातून २०१७-१८ मध्ये संख्याशास्त्र या विषयातुन पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पदव्युत्तर शिक्षण २०१९-२० मध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केल.त्यानंतर विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करत असतांना नेट, सेट, गेट आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वन विभाग, आरोग्य विभागाच्याही परिक्षा उत्तीर्ण झाली.
तसेच गतवर्षी आय एस एस बरोबरच रिझव्ह बँक ऑफ इंडियाची संशोधन अधिकारी पदाची परिक्षा देखील ती उत्तीर्ण झाली. तिच्या या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.जे. बार्नबस यांनी तिचा सत्कार केला. यावेळी महाविद्यलयाचे उपप्राचार्य संख्याशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. दिलीप भालसिंग, श्री चंद्रशेखर सर, डॉ.माळती येवले, संख्याशास्त्र विभाग व सहकारी प्राध्यापक व योगेश येवले, रेश्मा वाध, प्रगती शिंदे उपस्थित होते.
कु. योगिता हिने, तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या काका लहू नरवडे यांना दिले. तसेच संख्याशास्त्र विभाग आणि महाविद्यालय यांचा आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.