Ahmednagar College: हिंदी प्रसारार्थ डॉ.आडकर ट्रस्ट आणि अहमदनगर महाविद्यालयात सामंजस्य करार

 Ahmednagar College: हिंदी प्रसारार्थ डॉ.आडकर ट्रस्ट आणि अहमदनगर महाविद्यालयात सामंजस्य करार

Ahmednagar College: हिंदी प्रसारार्थ डॉ.आडकर ट्रस्ट आणि अहमदनगर महाविद्यालयात सामंजस्य करार



     Ahmednagar College:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : नव्या पिढीत हिंदी भाषे विषयी प्रेम, आस्था निर्माण करुन आजच्या काळात हिंदी भाषेला होणारा विरोध रोखण्यासाठी अहमदनगर महाविद्यालय हिंदी विभाग व डॉ.शंकर केशव आडकर चॅरिटेल ट्रस्ट यांच्यात सांमजस्य करार संपन्न झाला.


     अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रजनीश बार्नबस हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.ऋचा शर्मा, आडकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गिरिष कुलकर्णी, सचिव अशोक कुरापाटी यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या.


     1960 साली अहमदनगर कॉलेजमध्ये हिंदी विभाग कार्यरत झाला. या विभागाच्या समृद्धी व विस्तारासाठी डॉ.शंकर केशव आडकर यांनी विभाग प्रमुख म्हणून महत्वपुर्ण योगदान दिले होते.


     शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हिंदी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा हिंदी विषयांचे शिक्षक, प्राध्यापकांची सृजन सभा, त्यांच्यासाठी चर्चासत्रे, ज्ञानसत्रे, परिसंवाद, व्याख्यानमाला, तज्ञांचे प्रबोधन शिबीर, डॉ.शंकर आडकर स्मृती पारितोषिक योजना, उर्दू भाषा शिकणार्‍या जिज्ञासूसाठी व्यासपीठ निर्माण करणे, 


हिदी विषयात पीएचडी, एमफील करणार्‍या संशोधन कार्यास मदत, त्यांचा सन्मान, हिंदी विषेसाठी समर्पित मासिके, नियतकालिके, प्रकाशकांचा, सेवाभावी संस्थांचा गौरव महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे या संस्थेचे विविध उपक्रम राबविणे इ. उदिष्ट्यांची पुर्तीसाठी हा सामंजस्य करार करणेत आल्याची माहिती आडकर ट्रस्टचे विश्वस्त डॉ.सुनिल कात्रे व अ‍ॅड.उमेश नगरकर यांनी दिली.