Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र

अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र 

Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र



 अहमदनगर । दर्शक :

 गुन्हेगारीचे प्रमाण सावकाश पणे वाढत-वाढत इतके वाढले कि दररोज चोरी,घरफोडी, दरोडे, हाणामाऱ्या,टोळीयुद्ध,गॅंगवॉर या आणि अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अहमदनगर शहर आणि परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 जागोजागी लूटमार दिवसाढवळ्या दरोडे आणि घरफोड्या एकंदरीत काय तर गुन्हे वाढले आणि गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले कायदा आणि सुव्यवस्था  पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविणे गरजेचे झाले आहे.


अहमदनगर शहर गुन्हेगारांचा अड्डा नव्हे तर कायदा सुव्यवस्थेचा शहर आहे हे आता एसपी साहेब तुम्हालाच सिद्ध करावे लागेल कारण अहमदनगर शहरात वाढले आहे चोऱ्यांचे सत्र तुम्हाला काढावेच लागेल आता गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र.


तोफखाना हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. तसेच, कोतवाली हद्दीतील चार दिवसांपासून बंद असलेल्या घरात घुसून दागिने आणि रोकड चोरून नेली. या चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी 10 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 11 सप्टेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


1. बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील बंगला फोडून चोरी : 

बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि चार लाख 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली. 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बंगल्यावर कुलूप लावून बंद केले गेले होते, आणि 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चोरीची घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


2. तपोवन रस्त्यावर धनलक्ष्मी रेसीडेन्सी घर फोडून चोरी :

तपोवन रस्त्यावर समतानगर येथील धनलक्ष्मी रेसीडेन्सी मधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाची रोकड, सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि साडे सहा भाराचे चांदीचे दागिने चोरले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत घडली.


3. मयुर कॉलनी तपोवन रस्त्यावर चोरी 

तपोवन रस्त्यावर मयुर कॉलनीतील व्यंकटेश अपार्टमेंट मधील दिपाली अविनाश दरंदले यांच्या घरातील 18 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण आणि चार हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरी 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली.


4. आडते बाजार वर्षा मेडिकल येथे चोरी 

आडते बाजार येथील गौतम मनसुखलाल भंडारी यांच्या मेडिकल दुकानात चोरट्यांनी 50 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.