Ahmednagar Crime: उदयनराजे पॅलेसचे कोतकर आणि यश पॅलेसचे गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

उदयनराजे पॅलेसचे सचिन कोतकर आणि यश पॅलेसचे शशिकांत गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

Ahmednagar Crime: उदयनराजे पॅलेसचे कोतकर आणि यश पॅलेसचे गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

 



अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तर हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.


हे दाखल झालेले गुन्हे हॉटेल संदर्भात कामगारांवरून झाल्याचे दिसते. दोन्ही गुन्हे हे हॉटेल व्यवसाय आणि कर्मचारी यांच्यातून होणाऱ्या व्यवसायिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले 


हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ‘तू हॉटेल यश पॅलेस येथे काम करायचे नाही, अन्यथा तुला नगरमध्ये राहू देणार नाही, जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून आठ ते दहा जणांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

राकेशकुमार रामनारायण सिंग (वय ४५, रा. नंदकिशोर रेसिडेन्सी, वडगाव गुप्ता रोड, नागापूर,अहमदनगर) असे मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.


राकेशकुमार हे पूर्वी उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. मात्र, त्यांनी ही नोकरी सोडून यश पॅलेस येथे नोकरी सुरू केली. तेव्हापासून उदयनराजे पॅलेसचा मालक सचिन कोतकर हा त्यांना ‘तू आमच्या समोर हॉटेल यश पॅलेस येथे काम करू नकोस, तू इतर कोठेही काम कर,’ असे म्हणत दमदाटी करत होता.


त्याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक अहमदनगर कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. घराकडे जात असताना सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून रोशनकुमार मिश्रा ऊर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग, नीरज कुमार, अमन श्रीकांतसिंग, सुनीलकुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर व ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी दमदाटी करत ‘तुला नगरमध्ये राहू देणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे.


दरम्यान हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये प्रिन्स कुमार हरी नारायण सिंग यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,


 अहमदनगर शहरातील हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे व राकेश सिंग यांनी मला एका नम्बरवरून कॉल करून तू उदयनराजे पॅलेसलाच का कामाला गेला अशी विचारणा करत शिवीगाळ केली. हे काम सोडून नगर सोडून जा अन्यथा तुझ्यासह तुझ्या मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवू असे फिर्यादीत म्हटले आहे.