धन्या आणि टोळीने या कारणाने केला भीम्यावर गोळीबार
अहमदनगर (प्रतिनिधी)
शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरूणावर कुऱ्हाड, चॉपर, दगडाने जीवघेणा हल्ला करत तरूणाच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना मध्यरात्री कोठला परिसरात घडली आहे.
जखमी सरवर अस्लम शेख (वय ३३ रा. सुभेदार गल्ली, नगर) उर्फ भीम्या यांच्या जबाबावरून दानिश दारूख शेख ऊर्फ धन्या , साहील (पूर्ण नाव माहिती नाही), उफेर शेख ऊर्फ लाला गणेश पोटे ऊर्फ टिंग्या, तालीब (पूर्ण नाव माहिती नाही), दानिश ऊर्फ धन्या यांच्याविरूध्द तोफखाना पोल्स ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: सरवर शेख यांचा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.अहमदनगर मार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस मध्ये प्रवाशी सीट बुकिंग करून त्यांना जागा करून देणे आणि तिकीट बुकिंग करणे असा या व्यवसायाचा प्रकार आहे.
त्यांचे गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी दानिश फारूख शेख व साहील यांच्यासोबत प्रवासी सिट भाड्यावरून किरकोळ वाद झाले होते. सरवर शेख हे त्यांचा मित्र सादीक शेख सोबत शनिवारी दि. २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता कोठला येथील बाकड्यावर बसलेले होते.
दरम्यान दानिश फारूख शेख ऊर्फ धन्या व साहिल याने सरवर यांच्यावर अचानक मागून येऊन कुऱ्हाडीने वार केले. हल्ला झाल्याने सरवर तेथून पळून जात असताना उफेर ऊर्फ लाला, गणेश पोटे यांनी चॉपरने वार केले. तसेच थोडे पुढे गेल्यावर धन्या ऊर्फ दानिश याने बंदुकीने त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकाराने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, सरवर शेख याने
दिलेल्या फिर्यादीत “मेंबर ने जैसा बोले वैसा कर” (मेंबरने जसे सांगितले तसे कर) असे आरोपी एकमेकांशी
बोलतानाचा उल्लेख आहे
त्या दिवशी झालेल्या किरकोळ वाद आणि बाचाबाची मुळेच हा हल्ला झाला कि दुसरे काही कारण आहे कि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकारण हि यात सामील आहे का? छोटी मोठी भांडणे या ट्रॅव्हल सीट बुकिंगवरून जुने बसस्थानक याठिकाणी नेहमीच होत असतात परंतु त्याचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात होणे हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत याबाबत अधिकच तपास पोलीस करत असून सर्व सत्य लवकरच बाहेर येईल
सध्या सुरू असलेले लोकसभा निवडणुकीचे वारे आणि या हल्ल्यामागे त्या अनुषंगानेही तपासाची चक्रे फिरणार आणि फिर्यादीने उल्लेख केलेल्या मेंबर बद्दलही पोलीस सत्य उलगडणार