Ahmednagar District Jail : उपक्रमांतून बंदीवानांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न : कारागृह अधिक्षक प्रदीप जगताप

 Ahmednagar District Jail :  जिल्हा कारागृहातील बंदीवानांची आरोग्य तपासणी

Ahmednagar District Jail : उपक्रमांतून बंदीवानांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न  : कारागृह अधिक्षक प्रदीप जगताप


    अहमदनगर (प्रतिनिधी)  – जिल्हा कारागृहाच्यावतीने बंदीवानांसाठी नियमित विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असते. धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच तज्ञांच्या समुपदेशान द्वारे बंदीवानामध्ये चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेळीच निदान होऊन उपचार केल्यास कोणताही आजार बरा होऊ शकतो.


  शिबीराच्या माध्यमातून बंदीवांनाचे आरोग्य सुदृढ रहावे, आजारांबद्दलच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विविध आजारांबाबत जागृती होऊन त्याबाबतची काळजी, उपाय आणि उपचाराबद्दलची महत्वपूर्ण माहिती बंदीवानांना मिळाली आहे. अशा उपक्रमांतून त्यांच्या जीवनमान सुधरण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा करागृह अधिक्षक प्रदीप जगताप यांनी केले.


     अहमदनगर जिल्हा कारागृहातील बंदीवांनासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी कारागृहा अधिक्षक प्रदीप जगताप, वैद्यकीय अधिकारी पांडूरंग जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, वैद्यकीय अधिकारी श्री.केळगंद्रे, राहुल कडूस, दिनेश लोंढे, नितीन घोडके आदि उपस्थित होते.


     यावेळी बंदीवानांची एचआयव्ही तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपाय योजना, घ्यावयाची काळजी, उपलब्ध उपचार पद्धती, समज- गैरसमाज, शंका व त्याचे निरसन तज्ञांनी केले.  गुप्तरोग या संबंधितांतील रक्तनमुने तसेच कावीळ व दंतरोग तपासणी करण्यात आली.


     शिबीराचे नियोजन औषधनिर्माण अधिकारी श्रीमती क्रांती सोनमाळी, परिचारक संदिप जर्‍हाड यांनी केले. यावेळी तुरंग अधिकारी बिभीषण तुतारे, श्रीमती सुवर्णा शिंदे, सुभेदार बालाजी सावंत आदि उपस्थित होते.