Ahmednagar Kusti : कुस्तीसाठी चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज : कुस्तीपटू आर्या शिंदे

कुस्ती खेळासाठी दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता

आणि तेज बुद्धीमत्तेची गरज – कुस्तीपटू आर्या शिंदे

Ahmednagar Kusti : कुस्तीसाठी चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज : कुस्तीपटू आर्या शिंदे


   अहमदनगर (प्रतिनिधी)  – महाराष्ट्रातील गावाकडील खेळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ आठवतात. पण आता कुस्ती (Ahmednagar Kusti) हा खेळ देखील गावापुरता मर्यादित न राहता भारतासह संपूर्ण जगात खेळला जातो. कुस्ती खेळासाठी खेळाडूंकडे चांगली दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज असते, असे प्रतिपादन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पदकविजेती आर्या शिंदे हिने केले.

      कु.आर्या हिने चंद्रपुर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यु-19 मध्ये 72 किलो वजन गटात सिल्व्हर मेडल तर अमरावती येथील शालेय राज्यस्तरीय ज्युदो-कुस्ती स्पर्धेत यु-19 मध्ये सिल्व्हर मेडल पटकाविले तर अकलुज येथील ताराराणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये यु-17 मध्ये कांस्य पदक मिळाविल्याबद्दल अ.नगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, सचिव मच्छिंद्र बनकर, रविंद्र कुसळकर, मंगेश रोकडे, विवेक गायकवाड, भाऊसाहेब कोल्हे, बाळासाहेब पालवे, लवेश गोंधळे, जालिंदर बोरुडे, सागर नांदुरकर, संदिप घुले, छाया नवले, अनुरिता झगडे, रोहिणी बनकर, बाळासाहेब इवळे, आदिनाथ गायकवाड आदि उपस्थित होते.

     कु. आर्या पुढे म्हणाली, तसा कुस्ती हा खेळ प्राचिन काळापासून खेळला जात होता. राजे-महाराज पासून ते आजपर्यंत हा खेळ जिवंत ठेवण्याचे काम मल्लांनी केले. त्यामध्ये महिला कुस्ती स्पर्धा होऊ लागल्याने आम्हाला आमचे डावपेच चपळता, निर्णयक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली व त्या संधीचे सोने मला मिळालेल्या पुरस्काराने झाले, असे वाटते.

     जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड म्हणाले, कुस्ती हा खेळ लोकप्रिय आहे. लाल मातीत होणारी कुस्ती, परंपरेने या खेळामुळे शरीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा एक व्यायाम होता. तो आजही आपले पैलवान मैदानांवरील कुस्तीमधून करतात. हा खेळ दोन खेळाडूंमध्ये असल्याने एकाला जमिनीवर लोळविण्याचा प्रयत्न दुसरा करत असताना त्यांच्या चेहर्‍यावरील विजयाचा आनंद पाहण्याचे समाधान आपल्याला मिळते.

चौकट

     कु.आर्या शिदें ही 16 वर्षांची असून, इ.10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. वडिल गणेश शिंदे यांचे सोनई येथे इस्तरीचे दुकान आहे. आळंदीमध्ये शिक्षणाचे धडे घेण्याबरोबरच वडिल व भाऊ हे कुस्तीपटू असल्याने आपणही कुस्तीत नाव कमवावे. तसेच महिलांवरील वाढणारे अत्याचार चिंताजनक असल्याने त्यावर मात करण्यासाठी स्व:संरक्षणासाठी ज्युदो व कराटे व कुस्ती खेळ उपयुक्त ठरेल. आजच्या तरुणींनी संकटात दोन हात करण्याची तयारी ठेवून कुस्ती, कराटे खेळास प्राधान्य द्या, असे आवाहन केले.

     शेवटी कु.आर्या हिचे वडिल गणेश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.