Ahmednagar Maratha: अहमदनगर व उपनगरातून मराठा कार्यकर्त्यांचा बंदचे आवाहन करत मोर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नगरशहरात व उपनगरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता . या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
सर्व सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल,याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला.
त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह बंद पुकारण्यात आला होता.