Ahmednagar Music: ऋणानुबंध तर्फे ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सुरेल कार्यक्रमाचे शनिवारी अहमदनगरमध्ये आयोजन
अहमदनगर- शहरातील ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेतर्फे येत्या शनिवारी ८ जून २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत क्लब महिंद्रा, मॅजिकल ब्लॅक अँड व्हाईट म्युझिकल इव्हिनिंग या जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन माऊली सभागृहात केले आहे. ऋणानुबंध संस्था स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी आणि सचिव प्रशांत बंडगर आणि खजिनदार शुभांगी ओहोळ यांनी म्हटले आहे. ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने मागील वर्षभरात गीतांच्या बहारदार कार्यक्रमांबरोबरच अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.
११ आत्मनिर्भर महिलांचा सन्मान करून त्यांचा संघर्ष आणि यशोगाथा लोकांसमोर आणली तसेच शिक्षण क्षेत्रात वेगळे व अतुलनीय काम करणाऱ्या शिक्षक आणि संस्थाचालकांचा सन्मान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक चित्रपटसृष्टी बहरण्यासाठी भारतातील गायक कलाकार आणि ऍक्टर्स चा मोठा वाटा आहे. रंगीत सिनेमा येण्या अगोदर ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावर सिनेमे पाहिले जायचे. परंतु काळ पुढे सरकत राहिला तरी त्या वेळेची गीते मात्र अजरामर झाली. त्या काळातील गीतांचे बोल आजच्या पिढीपर्यंत सर्वांच्या मुखातून गुणगुणत राहिले आहेत. रसिक प्रेक्षकांची हीच आवड ध्यान्यात घेऊन ‘ऋणानुबंध’ ने ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील गीतांचा नजराणा नगरकरांसमोर ठेऊन प्रत्येकाच्या मनातील आवडीचे गीत ऐकण्याची संधी दिली आहे.
या कार्यक्रमात राज कपूर, शमी कपूर, राजेंद्र कुमार, देवानंद, किशोर कुमार, नूतन, मधुबाला, वहिदा रहेमान, नर्गिस इ. अनेक गाजलेल्या कलाकारांवर चित्रित गाण्यांचा ट्रॅक शो आणि लाइव्ह म्युझिशिअन सह कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक क्लब महिंद्रा (महिंद्रा हॉलीडेस) आहेत तर मलाबार गोल्ड अँड डायमंड्स हे मुख्य सहप्रायोजक आहेत. तसेच काशीद हॉस्पिटल, वेद सोनोग्राफी, वसंत पेन्ट्स, माधवबाग हे सह प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमात क्लब महिंद्रा कडून लकी ड्रॉ काढला जाणार असून पाच भाग्यशाली प्रेक्षकांना क्लब महिंद्राच्या फाईव्ह स्टार रिसॉर्ट मध्ये २ रात्री ३ दिवस विनामूल्य राहता येणार आहे. असे क्लब महिंद्रा, अहमदनगर कार्यालयाने कळवले आहे. तसेच मलाबार गोल्ड अँड डायमंड्स कडून तीन भाग्यशाली प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमात, डॉ. विवेकानंद कंगे, डॉ. खंडागळे, महेश घावटे, भानुदास महानुर, चारुदत्त ससाणे, प्रशांत बंडगर, अजय आदमाने, दुर्गा हूरे, शुभांगी ओहोळ, नीता गडाख, सीमा रघुवंशी, सारिका रघुवंशी, अपर्णा बालटे इ. कलाकार गीते सादर करणार आहेत. सूत्रसंचालन चारुता शिवकुमार करणार आहेत.
सादर कार्यक्रम विनाशुल्क असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सदस्य महेश घावटे, भानुदास महानुर, डॉ कंगे आणि डॉ. दमण काशीद यांनी केले आहे.