Ahmednagar News: काळाची पावले ओळखून पतसंस्थेने प्रगती साधावी : नारायण मंगलारम

Ahmednagar News: श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या ‘क्यू आर कोड’चे लोकार्पण

Ahmednagar News: काळाची पावले ओळखून पतसंस्थेने प्रगती साधावी : नारायण मंगलारम

(Photo Shirkant Vangari Ahmednagar)

     अहमदनगर (प्रतिनिधी)  – मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था ही अहमदनगर शहरातील एक विश्वासार्हया व महत्वाची अर्थसंस्था म्हणून आपला नावलौकिक कायम राखून आहे. पद्मशाली समाजाबरोबरच गोर-गरीब, गरजू लोकांना अर्थपुरवठा करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात मोलाचे योगदान देत आहे. 


काळाची पावले ओळखत संस्थेने आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या औचित्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकिंग मधील वापर ओळखून ‘क्यू आर कोड’ची सुविधा आपल्या ग्राहकांना, सभासदांना उपलब्ध करून दिली आहे, ही कौतुकाची बाब आहे. येणार्‍या काळात संस्थेने स्वतःच्या A‘एटीएम’ ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी व्यक्त केली.


     राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून दिल्लीगेट येथील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहमदनगरच्यावतीने ‘क्यू आर कोड’चे लोकार्पण मनपा नगरसेवक मनोज दुलम, शहर सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय रासकोंडा, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, चेअरमन नारायण कोडम, व्हाईस चेअरमन विनायक मच्चा, बालराज सामल आणि संचालक मंडळ व कर्मचार्‍याच्या उपस्थितीत संपन्न झाले.


     याप्रसंगी दत्तात्रय रासकोंडा म्हणाले, पतसंस्था व बँकांमध्ये मोठी स्पर्धा आहे, अशा परिस्थिती ग्राहकांसाठी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे संस्थेच्या हिताचे आहे. ‘क्यू आर कोड’च्या मदतीने संस्थेचे आर्थिक व्यवहार नक्की वाढतील, व्यवहारात अधिक गतिमानता येईल आणि उलाढाल ही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.


     याप्रसंगी नगरसेवक मनोज दुलम म्हणाले, संस्थेने अशीच प्रगती  उत्तरोत्तर करत नगरकरांना विविध सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात.आमची कुठेही काही मदत लागली तर आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत, असे सांगून  शुभेच्छा दिल्या.


     यावेळी संस्थेचे चेअरमन नारायण कोडम यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा सादर करुन सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्हाईस चेअरमन विनायक मच्चा यांनी सूत्रसंचालन केले तर  जेष्ठ संचालक बालराज सामल यांनी आभार मानले.  याप्रसंगी संजय चिप्पा, अजय लयचट्टी, विनोद म्याना, संचालक, कर्मचारी, सभासद, ग्राहक उपस्थित होते.