Ahmednagar News: तातडीने ‌ ड्रेनेज लाईन साफसफाईचे काम सुरू; नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडून दखल

  Ahmednagar News: तातडीने ‌ ड्रेनेज लाईन साफसफाईचे काम सुरू; नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडून दखल

Ahmednagar News: तातडीने ‌ ड्रेनेज लाईन साफसफाईचे काम सुरू; नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडून दखल


Ahmednagar News: अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नगर कॉलेज जवळ. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कार्यालयासमोर हाजी हसन शहा कादरी कब्रस्तान च्या गेट समोर ड्रेनेज चेंबर पूर्णपणे भरून त्यामधून घाण पाणी गेल्या एक महिन्यापासून रस्त्यावर वाहत होते. 
याबाबत कार्यकर्तबगार सामाजिक कार्यकर्ता पत्रकार शाकीर शेख यांनी सोशल मीडियावर सदरचा व्हिडिओ प्रसारण केलं होतं व त्याची दखल घेऊन स्थानिक युट्युब न्यूज चॅनेल यांनी बातमी प्रसिद्ध केली होती.
 या सर्व प्रकरणाची अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक श्री अविनाश घुले यांच्याकडून दखल घेतली आहे त्यांनी उपअभियंता श्रीकांत निंबाळकर. प्रभागाचे स्वच्छते निरीक्षक. सामाजिक कार्यकर्ता शेख कौसर भाई . सफाई कामगार सदर ठिकाणी उपस्थित होते.
 श्री घुले यांनी स्वतः उपस्थित राहून गटरीचे साफसफाई चे काम सुरू करून घेतले त्याबद्दल त्यांचे आणि माध्यमांचे शाकीर शेख यांनी आभार मानले.