Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत

 Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत

Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत



      Ahmednagar OBC: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी सर्व जातींना बरोबर घेत काम करत आहेत. ओबीसींसाठी महामंडळाची स्थापना व विशेष कर्ज योजना सुरु करून सर्व ओबीसी जातींना प्रगतीच्या प्रवाहात आणले आहे. ओबीसांचे गेलेले राजकीय आरक्षणही परत देण्याची क्षमता फक्त भाजपातच आहे. 


त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे. नगर शहरात बाळासाहेब भुजबळ यांनी अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या या कामची पावती म्हणून त्यांना सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांचे अभिनंदन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्राचार्य सुनील पंडीत यांनी केले.


       शहराच्या ओबीसी मोर्च्याच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ यांची दुसर्‍यांदा वर्णी लागल्या बद्दल प्राचार्य सुनील पंडीत यांनी श्री.भुजबळ यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी परिषदेचे राज्य सचिव विठ्ठल उरमुडे, नाशिक विभाग अध्यक्ष शरद दळवी, प्रांत कार्यकारणी सदस्य सुनील सुसरे, सुभाष येवले आदींसह शिक्षक उपस्थित होते.


      बाळासाहेब भुजबळ म्हणाले, नगर शहरात भाजपाची ताकद वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनाचा थेट लाभ नागरिकांना होत असल्याने सर्वसामान्य नागरिक भाजपावर खुश आहेत. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून शहरातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यास प्रध्यान देवून भाजपचे काम वाढवणार आहे. प्रा.सुनील पंडीत यांनी केलेला सत्कार जबाबदारी वाढवणारा व प्रेरणा देणारा आहे.