Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयाचा चाले अजब असा कारभार ! दळणवळणावर मोठा परिणाम

 Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयात फिटनेस देण्यास विलंब, हजारो वाहने आडकुन पडली

Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयाचा चाले अजब असा कारभार ! दळणवळणावर मोठा परिणाम


अहमदनगर (प्रतिनिधी) –

प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) फिटनेस प्रमाणपत्र देण्यास तब्बल १८ दिवसांचा विलंब केल्याने हजारो वाहने अडकून पडली आहेत. या अडथळ्यामुळे वाहन चालक,मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मोठा विलंब होत आहे.

सध्या महाराष्ट्रात हजारो वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून फिटनेस प्रमाणपत्र (fitness certificate) देण्यास वेळ लागत असल्याने सदरील वाहने फिटनेसवीना आडकून पडली आहेत. त्यामुळे वाहनधारक व वाहतूकदारांचे हाल होत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान (financial loss) होत असून अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यभरातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.

“फिटनेस प्रमाणपत्रे देण्यास विलंब झाल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंचा (essential goods) पुरवठा करणाऱ्या व्यवसायांवर होत आहे.

नूतनीकरण पत्रे सादर केल्यावर जलद नूतनीकरण करण्याची परवानगी देणारी पूर्वीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUS) ने सुसज्ज असलेल्या वाहनांना देखील सिस्टममधील तांत्रिक चुकांमुळे फिटनेस प्रमाणपत्र नाकारले जात आहे.अशा प्रकारे वाहन चालक,मालकांना वेठिस धरण्याचा अजब कारभार सध्या काही प्रादेशिक परिवहन कार्यालयातुन बघावयास मिळतो आहे.