Ahmednagar Shivsena: एस.टी. कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु – शहरप्रमुख दिलीप सातपुते

 Ahmednagar Shivsena:  शिवसेनेच्यावतीने एस.टी.कामगार संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

Ahmednagar Shivsena: एस.टी. कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु  - शहरप्रमुख दिलीप सातपुते


     अहमदनगर (प्रतिनिधी)  – एस.टी.ने गावपातळी पासून मेट्रोसिटीपर्यंत आपल्या चांगल्या सेवेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांचे प्रवासी वाहन म्हणून एस.टी.कडे पाहिले जाते. एस.टी.ने ‘सुखकर प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे ब्रीद कायम ठेवले आहे. कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमातून एस.टी. आज मानाने रस्त्यावर धावत आहे. एस.टी. कर्मचार्‍यांच्या प्रश्न व हक्कासाठी लढा देणार्‍या कामगार संघटनेने नेहमीच सभासदांच्या हितासाठी काम केले आहे. अशा संघटनेचे नूतन पदाधिकारी संघटनेच्या लौकिकात भर घालण्याचे काम करतील, हा विश्वास आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या (Ahmednagar Shivsena)  माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुराव करुन, ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

     एसटी कामगार संघटनेची नुकतीच विभागीय  बैठक पार पडली या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव अकोलकर,  विभागीय सचिवपदी शिवाजी कडूस, खजिनदारपदी उत्तमराव रणसिंग, कार्याध्यक्षपदी रोहिदास अडसुळ आदिंची निवडी करण्यात आली.

     अहमदनगर शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिलीप लबडे, संजय धनवडे, प्रविण ढगे, राहुल जाधव, नितीन चव्हाण, महेंद्र कोतकर, भारत कांडेकर, मुकेश जोशी, सोनु सैंदाणे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नुतन अध्यक्ष ज्ञानदेव अकोलकर म्हणाले, एसटी कामगार संघटना ही मान्यता प्राप्त संघटना असून एसटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी भांडणारी संघटना कामगारांची स्थानिक प्रश्न केंद्र पातळीवर जिल्हा पातळीवरील राज्यपातळी प्रश्न यासाठी वेळोवेळी आवाज उठवत असून कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्क देण्यासाठी सदैव तत्पर राहु, असे सांगून शिवसेनेच्यावतीने आमचा सत्कार करुन आम्हास पाठबळ देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी शिवाजी कडूस यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. उत्तमराव रणसिंग यांनी सर्वांचे आभार मानले.