Ahmednagar: ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके ; उपाध्यक्षपदी नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख यांची निवड

 अहमदनगर मनपा अधिकृत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके तर नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख उपाध्यक्षपदी निवड

ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके ; नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख उपाध्यक्षपदी निवड


 

अहमदनगर (प्रतिनिधी) : 

अहमदनगर मनपा अधिकृत नोंदणीकृत शासकीय ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीचा ठराव शाकीर शेख यांनी मांडला या बैठकीला उपस्थित सर्व अधिकृत नोंदणी कृत मनपाच्या ठेकेदारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा मांडलेला ठराव एकमताने मंजूर केला.



संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी अहमदनगर मनपातील प्रसिद्ध ठेकेदार शेख शोएब शेख आणि ओमकार देशमुख यांची निवड करण्यात आली. अहमदनगर महानगरपालिके -च्या ठेकेदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सचिन लोटके आणि उपाध्यक्ष नाजीर शेख,शोएब शेख,ओमकार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी राजेंद्र लोणकर, आनंद पुंड, शाकीर शेख, अनुप शेख, अभिजीत काळे,नितीन फुलसौंदर,मोईन खान, अक्रम शेख, इमरान शेख,नंदू धाडगे, भैय्या पठाण, कुलदीप भिंगारदिवे, प्रसाद चेन्नई, महेश, निकेतन लोटके, शाहनावाज शेख, राहुल पडोळे, दीपक कावळे,अकीस शेख,जहीर शेख,मोहसीन शेख,तारिक शेख,अभिजीत चिप्पा, सुमित जायभाय,अमोल नांगरे,शाहरुख शेख, प्रसाद साळी विकर शेख,जावेद राजे,आदींसह ठेकेदार उपस्थित होते



नूतन ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सचिन लोटके म्हणाले अहमदनगर मनपा संघटनेच्या ठेकेदारांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार अहमदनगर मनपातील केलेले काम आणि होणारी बिले यात ठेकेदार कमीत कमी वेळेत बिल घेउन पुढील काम सुरु करेल असे त्यांना सहकार्य करणार. 



तसेच यावेळी बोलताना उपाध्यक्ष नाजीर शेख म्हणाले कि, अहमदनगर शहरातील विविध प्रभागात आपण सर्वानी विकासकामे केलेली आहे आणि हि कामे करताना त्या-त्या ठिकाणी येणाऱ्या विविध अडचणी आणि मनपा मध्ये काम झाल्यानंतर येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करणार.


उपाध्यक्ष शोएब शेख म्हणाले ठेकेदारांना बिल वेळेवर मिळत नाही व बयाना रक्कम डिपॉझिट मिळणेबाबत तसेच छाननी लवकर करणे आणि बिल काढण्यात येणाऱ्या अडचणी सोडविणार.

 


उपाध्यक्ष ओमकार देशमुख म्हणाले कि थकीत देयके गेल्या अनेक वर्षांपासून फार मोठ्या प्रमाणात अडकले आहेत याबाबत आपण प्रयत्न करून ठेकेदार आणि पालिका यात पाठपुरावा करून हि समस्या सोडविणार.