Award Shrirampur | समाजाचे वैचारिक पोषण केल्याने शाश्वत विकास रुजवता येईल : मा.आ.लहू कानडे
श्रीरामपूर : दर्शक ।
Award Shrirampur | श्रीरामपूर येथे लोकहक्क फौंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा
अनुराधा आदिक,उद्योजक सारंगधर निर्मळ,अरुण नाईक,कैलास बोर्डे,अर्चना पानसरे,भास्करर खडगळे आदी
मान्यवरांसह श्रीरामपूर आणि राहुरी येथील पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.
मा.आमदार लहू कानडे व मा नगरसेवक अशोक कानडे यांच्या लोकहक्क फौंडेशनच्या वतीने स्व अशोक तुपे
पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो ११ हजार रुपये रोख स्मृती चिन्ह आणि शाल असे या पुरस्कारचे स्वरूप असते यंदा हा पुरस्कार नगरचे लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना मा.आ. कानडे म्हणाले कि समाजाचे वैचारिक पोषण गरजेचे असून यामुळे शाश्वत विकास रुजवता येईल सध्या परिस्थिती वाईट असून धर्म हा शब्द उच्चारला तरी हल्ला होण्याची भीती वाटते.
यावेळी बोलताना सुधीर लंके म्हणाले कि शिव,शाहू,फुले आणि आंबेडकरांचा वैचारिक वारसा आपण विसरत चाललो आहोत समाजसुधारणेची प्रक्रिया राज्यात थांबल्याचे चित्र निर्माण झाले आहे परिणामी जातीय व धार्मिक द्वेष पसरत चालले आहे हे थांबणे अत्यावशक झाले असून जाती-पाती,धर्म द्वेष याचा गैरफायदा राजकीय मंडळी आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी वापर करत असून समाज अफवांना बळी पडण्यात अग्रेसर झाला आहे.
पुरस्काराची संपुर्ण रक्कम सुधीर लंके यांनी पत्रकार भवनसाठी निधी म्हणून विठ्ठल लांडगे यांच्याकडे सुपूर्द केला
त्यांच्या या कार्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.