Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarBajar Samiti Nagar | नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन संपन्न 

Bajar Samiti Nagar | नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन संपन्न 

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन संपन्न 

 

 

 

Bajar Samiti Nagar |  नगर : दर्शक ।

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  नेप्ती उपबाजार येथील सात एकर जागेतील  कांद्याचे शेडचे भूमिपूजन  आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नेप्ती  कांदा बाजारचे शिल्पकार भानुदास कोतकर,उदयनराजे कोतकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,दादाभाऊ चितळकर,बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे,व्हाईस चेअरमन रभाजी सूळ,अभिलाष घिगे,रामजी साबळे,अरुण होळकर,विठ्ठल  जपकर,अशोक झरेकर,देवाजी होले,नारायण आव्हाड,दादाजी दरेकर,हरिभाऊ कर्डिले,संतोष म्हस्के,सुधीर भापकर,संजय गिरवले ,धर्मनाथ आव्हाड,रामदास सोनवणे,भाऊ गुरुजी भोर,मंजाबापू घोरपडे,संजय निमसे,मधुकर मगर,भाऊसाहेब ठोंबे,राजू आंबेकर,अभय घिगे ,रामदास आंधळे आदींसह अनेक मान्यवर,शेतकरी,व्यापारी व नागरिक उपस्थित होते

 

 

यावेळी बोलताना आमदार कर्डिले म्हणाले ज्यावेळेस नेप्ती बाजार ची जागा घेतली होती त्यावेळेस ही जागा अगदी शहरा बाहेरची होती, आज ती हायवेमुळे शहरात आली आहे आता ही जागा ही अपुरी पडत आहे व त्यासाठी आता पुन्हा शेजारील सात एकर जागेत आपण शेड बनवत असून त्यापैकी तीन एकर जागा पार्किंगसाठी आहे . उर्वरित चार एकर जागेमध्ये सात हजार स्क्वेअर फुटाचे कांदा लिलाव शेड असणार असून या शेडमध्ये पहिल्या मजल्यावर ३६ गाळे  ऑफिस साठी तयार करणार आहोत ,शेड भोवती भोवती 15 ते 20 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते ,ड्रेनेज व्यवस्था, कंपाउंड, विद्युत व्यवस्था ,स्वच्छतागृह करणार आहोत.  हा सर्व एकूण प्रोजेक्ट 26 कोटीचा आहे.  पैकी 13 कोटी 72 लाखाचे शेड आहे . शेड साठी पणन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कर्ज प्रस्ताव दाखल केला आहे.  उर्वरित खर्च बाजार समिती स्वनिधी, बँक, व सबसिडी मार्फत उभा करणार आहोत

 

चिचोंडी पाटील येथे ही उपबाजार सुरू करणार आहोत असून त्याचे भूमिपूजन 14 सप्टेंबरला करणार आहोत तिथेही कांदा मार्केट सुरू करण्याचा विचार आहे तसेच ज्या ठिकाणी कांदा जास्त पिकतो अशा भागात जागा घेऊन त्या ठिकाणी ही मार्केट सुरू करण्याचा मानस आहे,कारण भविष्यामध्ये आपणास मार्केटला जागा कमी पडणार आहे त्यादृष्टीने नियोजन चालू आहे मार्केट कमिटी वाढीसाठी भानुदास कोतकर तसेच स्वर्गवासी अरुण काका जगताप यांचेही मोलाचे योगदान आहे असेही ते म्हणाले

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments