Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा
मुंबई गोवा महामार्गावर भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयाजवळ निलेश राणे यांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. त्यामुळे ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांसमोर आले. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगविले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मुंबई गोवा महामार्ग परिसर तसेच चिपळूण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच गुहागर शृंगारतळी येथे निलेश राणे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी निलेश राणे चिपळूणकडून गुहागरच्या दिशेने निघाले असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, राणे ठाकरे राड्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया#bhaskarjadhav #nileshrane #guhagarnews #RaneVsThackeray pic.twitter.com/8TufIhYiO7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 16, 2024
साभार सौजन्य ZEE २४ तास
नितेश राणे समोर येताच भास्कर जाधव आक्रमक; कोकणात राजकीय धुमशान#nileshrane #bhaskarjadhav pic.twitter.com/CM4IH3eYqk
— News18Lokmat (@News18lokmat) February 16, 2024
साभार सौजन्य News18Lokmat