Bhingar | भिंगारच्या चौंडेश्‍वरी मंदिरात रंगली देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची मैफल

 Bhingar | भिंगारच्या चौंडेश्‍वरी मंदिरात रंगली देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची मैफल

Bhingar | भिंगारच्या चौंडेश्‍वरी मंदिरात रंगली देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची मैफल




नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील चौंडेश्‍वरी मंदिराच्या सभागृहात देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची संगीत मैफल रंगली होती. हरदिन मॉर्निंग ग्रुप व देवांग कोष्टी समाजाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करा ओके या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विविध गीतांनी श्रोते भारावले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


चौंडेश्‍वरी मातेची पूजन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास प्रारंभ झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सीए श्रेयांश रविंद्र कटारिया व आंतरराष्ट्रीय धावपटू तथा पोलीस उपनिरीक्षक पूजा वराडे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. 



यावेळी हरदिनमॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष किशोर भिंगारकर, जहीर सय्यद, रमेश वराडे, सुमेश केदारे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, दीपक बडदे, सुभाष पेंढुरकर, अशोक पराते, 



अभिजीत सपकाळ, सचिन पेंढुरकर, ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, मनोहर दरवडे, अविनाश पोतदार, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, शेषराव पालवे, कुमार धतुरे, सुरेश कानडे, किरण फुलारी, आदेश बेल्हेकर, अविनाश जाधव, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.



संध्याकाळी रंगलेल्या संगीतमय कार्यक्रमात तुने मुझे बुलाया शेरावालिये…, दुखीयो के कष्ट निवारी…, मेरी माँ, मेरी माँ…. आदी देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीत सादर करण्यात आले. देवीच्या एकाहून एक सरस भक्तीगीतांनी वातावरण प्रसन्न बनले होते. वाद्यांसह बहरलेल्या गीतांच्या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.



या संगीत मैफलमध्ये सुनील हळगावकर, संजय भिंगारदिवे, ओंकार देऊळगावकर, जावेदभाई मास्टर, सईद खान, सुधाकर झावरे, कु. आराधना विशाल गायकवाड, रोझ मॅडम, सचिन थोरात, संतोष बारे, अजय आठवले, बॉबी सोनवणे, गौतम आठवले, विधान आठवले, अमित शेरकर या कलाकारांनी विविध गीतं सादर केली. 


कलाकारांनी आपल्या सूरमय व दमदार आवाजात सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. टाळ्यांच्या कडकडाटात रसिक श्रोत्यांनी दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर अळकुटे, प्रशांत भिंगारदिवे, सखाराम अळकुटे, सुनील वराडे, सचिन कस्तुरे, दशरथराव मुंडे, राजेंद्र बेरड, मच्छिंद्र जाधव, प्रकाश तरवडे, महेश तरवडे, शिवाजी बेरड, महेश घावटे, विशाल गायकवाड, योगेश हळगावकर यांनी परिश्रम घेतले.