Bhingar Cantonment | भिंगार बसस्टॉप शेजारचा कचरा कधी उचलणार? – सागर चाबुकस्वार यांचा कॅन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न

 भिंगार बसस्टॉप शेजारचा कचरा कधी उचलणार? – सागर चाबुकस्वार यांचा कॅन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न 

Bhingar Cantonment | भिंगार बसस्टॉप शेजारचा कचरा कधी उचलणार? - सागर चाबुकस्वार यांचा कॅन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न




अहमदनगर : दर्शक । 

 भिंगार शहरात नगर पाथर्डी रोडवर बस स्टॉप शेजारी खुप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. भिंगार शहरातील ज्या गाड्या कचरा जमा करतात त्या गाड्या ह्या सर्व बस स्टॉप शेजारी येऊन खाली करतात. व खाली केल्यावर त्या ठिकाणी कधी कधी तो कचरा त्या ठिकाणी जाळला जातो. तर कधी जाळला जात नाही. कचरा जाळल्यानंतर त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्याच्याच शेजारी इंदिरा नगर भाग असून  तेथील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. 


सध्या पावसाळा सुरु असून पावसामुळे कचरा ओला होऊन त्यामधुन दुर्गंधी येत असून तेथुन जाताना येताना त्या दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडत आहे.सध्या भिंगार शहरात डेंगु, चिकन गुण्याची साथ चालु आहे.त्यामुळे नागरिकांना यांचा त्रास होत आहे.सदर कचरा हा बुरुडगांव येथे टाकण्यात येतो.


 पण सध्या कॅन्टोन्मेट बोर्डाची अशी कोणती अडचण आहे. त्यामुळे तो कचरा भिंगार बस स्टॉप शेजारी टाकण्यात येत आहे. त्यामुळेच भिंगार शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी कन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न केला आहे. की तो कचरा आपण कधी उचलणार ? जर काही दुर्घटना या ठिकाणी झाली तर त्याला जबाबदार कोण? 


तरी सदर कचरा हा बुरुडगांव कचरा डेपो या ठिकाणी टाकण्यात यावा नाही तर खुप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात यईल. असा इशारा यावेळी भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी दिला.