Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

 Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त



अहमदनगर । दर्शक : 

 भिंगार शहर काँग्रेस कमिटीला नुकताच कै. काशिनाथ किसनराव त्रिमुखे (के के त्रिमुखे) पुरस्कार श्रीरामपुरचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते भिगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी स्वीकारला. काशिनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या जन्मशताब्दी नुकतीच भिंगार येथील वृंदावन मंगल कार्यालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. लहु‌जी कानडे हे होते. यावेळी रमेश त्रिमुखे यांनी हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता.

Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

    भिंगार शहर काँग्रेस  कमिटीने वर्षभरात केलेल्या  कामाची दखल के के  त्रिमुखे प्रतिष्ठान यांनी घेतली. भिंगार शहरामध्ये   सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम भिंगार शहर काँग्रेस  कमिटी करते. भिंगार शहरातील लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याच काम करत आहे. कचऱ्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो’ लाईटच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवला. व आंदोलन देखील केले. मागील आठवड्यात कचरा डेपोला आग लागल्यानंतर भिंगार कॉग्रेसने कॅन्टोन्मेट बोर्डाला निवेदन दिले होते. आता तेथील कचरा उचलुन तो दरेवाडी या ठिकाणी टाकण्यात आला. अशा अनेक प्रश्न भिंगार शहर काँग्रेसने मार्गी लावले, यामुळेच  भिंगार शहर कॉग्रेसला पुरस्कार प्राप्त झाला.

यावेळी के के त्रिमुखे प्रतिष्ठानचे रमेश त्रिमुखे, सुभाष त्रिमुखे, डॉ राहुल त्रिमुखे,  काँग्रसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, उपाध्यक्ष संतोष धिवर, चंदा धिवर, प्रल्हाद भिंगारदिवे,  रजनीताई जाधव, अक्षय पाथरिया, भूषण कांबळे, सुभाष थोरात , अक्षय पाथरिया, निलेश तरवडे, प्रल्हाद भिंगारदिवे, किशोर भगवाने, रजनीताई जाधव , नागपूरे काका, याच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.