दीन, दलित, वंचित अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा व्यवस्थेने न्याय नाकारला – आचार्य रतनलाल सोनग्रा
अहमदनगर : दर्शक ।
कर्मवीर वि.रा.उर्फ विठ्ठल रामजी शिंदे कार्य गौरव शीला अनावरण व जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन समारंभात रतनलाल सोनग्रा बोलत होते. वि.रा.शिंदे यांना दलितोद्धार चळवळीत झोकुन देवुन काम करण्याची प्रेरणा भिंगार येथील दलित वस्ती मधील जाहीर सभेतून मिळाली व तद्क्षणी त्यांनी आपला संकल्प जोडला आणि आपल्या ऐश्वर्याचा त्याग करित दलितोद्धार चळवळीसाठी वाहुन घेतले. दलित वस्तीत आपली बहीण जनाक्का यांचे समवेत निवासी वास्तव्य शेवटेचे श्वासापर्यंत केले. अनेक शाळा महाविद्यालचे काढुन दलितांना शिक्षणाची दारे खुली केली. केवळ राजाश्रया शिवाय त्यांचे कार्यकर्तृत्व झाकोळले आहे. असेही ते पुढे म्हणाले.
भिंगार येथे शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे गौरवशीलेचे अनावरण
भिंगार येथील श्रीमती अॅबट हायस्कूलचे प्रांगणात सदर कार्य गौरव शीलेचे अनावरण मान्यवरांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेचे कौन्सील सदस्य दादाभाऊ कळमकर हे होेते.
प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना सेवानिवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, शासनाचे सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा शाहु, फुले, आंबेडकर ह्या पुरस्काराचे नामविधान बदलुन शाहु, फुले, शिंदे आंबेडकर, पुरस्कार असे नामविधान करण्याची मागणी अनेक वर्षे केली जात आहे. परंतु शासन सदर मागणीस का? दुर्लक्षीत करित आहे. हे समजत नाही प्रा.भि.ना.दहातोंडे यांनी समग्र वि.रा.शिंदे याचे जीवन चरित्रावर मोठे संशोधन करुन ग्रंथ निर्मिती केलेली आहे.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रमुख पाहुणे शाहीर अरुण आहेर यांनी आपल्या बहारदार व पहाडी आवाजात, वि.रा.शिंदे यांचे कार्यकर्तृत्वाशी सांगड घालणारे स्वागत गीत सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले.
रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी मा. ज्ञानदेवजी पांडुळे यांनी वि.रा.शिंदे यांचे कार्य आणि रयत शिक्षण संस्थेचा ऋणानुबंध उलगडुन दाखविला.
संस्थेचे प्राचार्य सहाय्यक विभागीय अधिकारी मा. प्रमोदजी तोरणे यांनी सदर गौरवशीला आमचे प्रागणांत बसविल्यामुळे संस्थेचा सन्मान झाला असल्याची भावना व्यक्त करुन शिंदे यांचे विचार उद्याच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. सदर कार्यगौरव शीला बसविणे कामी संस्थेत येणार्या सर्व अडचणींवर मात करीत आजचा कार्यक्रम संपन्न होत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दादाभाऊ कळमकर यांनी समाधान व्यक्त केले.
विभागीय अधिकारी उत्तर विभाग नवनाथ बोडखे यांनी सर्वांचे स्वागत केले. संस्थेच्या आवारात होत असलेल्या या कार्यशीला गौरव अनावरण कार्यक्रमाने आमच्या वास्तूला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाल्याने आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगितले.
कार्यक्रमांसाठी श्री. व सौ. अरुणा गोयल, पर्यवेक्षक मुळे सर, मुख्याध्यापक अनभुले सर, ग्रंथमहर्षी लक्ष्मीनारायण रोहीवाल, नरेंद्रजी गोयल, रितुबाई अॅबट, शिवाजीराव भोर, नवनाथ बोडखे, आदी हजर होते.
मा. मुख्याध्यापक अनभुले यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्रीमती पडदुने व श्री. खेगडे सर यांनी केले.