Tuesday, November 18, 2025
HomeAhmednagarBlood Camp | “मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरु बनेल” – आमदार संग्राम जगताप

Blood Camp | “मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरु बनेल” – आमदार संग्राम जगताप

Blood Camp | देश गौरव – विश्व गौरव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा रक्तदान शिबिर

Blood Camp | नगर : दर्शक । – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जैन श्वेतांबर तेरापंथी उपसभा आणि अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान अमृत महोत्सव २.०’ या अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवाभावी भावनेचे दर्शन घडविले.

     या उपक्रमात आनंदऋषी हॉस्पिटल रक्तपेढी, जनकल्याण रक्तपेढी, सावेडी येथील हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स संस्था,  व्यापारी संघटना तसेच भाजप शहर जिल्हा सर्व सेल, व सर्व संस्था  यांचा सक्रिय सहभाग होता. या शिबिराचे मुख्य आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ सेलचे राज्य सचिव व केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल आणि प्रकाश बच्छावत यांनी केले.

      कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व  भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी , नगरसेवक निखिल वारे, मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत, भाजपा मंडळाचे , भाजपा सावेडी मंडलाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे, भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, भिंगार भाजपचे वसंत राठोड, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते, संतोष  गांधीमहेश  गुगळे चेतनजी संचेती आशिष खंडेलवाल नरेंद्रजी तोमर योगेश मुथा,विपुल शेटीया, कमलेश भंडारी, मुकुल गंधे, हर्षल बोरा. गोपाल वर्मा, दर्शन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते व अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. पदाधिकारी, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवा आत्मविश्वास दिला

     “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारत जगात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहे. ७५ वर्षांच्या वयातही ते तितक्याच जोमाने आणि निष्ठेने देशसेवा करत आहेत, हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अखंड भारताची संकल्पना पूर्ण करण्याचे सामर्थ्य मोदींमध्ये आहे. भारताला विश्वगुरु बनविण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरतील,” असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी केले.

      ते पुढे म्हणाले की, “आजच्या या रक्तदान शिबिरात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येतो आहे. समाजहिताच्या या उपक्रमामध्ये सुदर्शन डुंगरवाल यांनी केलेले संघटन व नियोजन कौतुकास्पद आहे. त्यांचे नेतृत्व आणि समन्वयामुळेच एवढा व्यापक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडू शकला. अशा सेवाभावी कार्यातून समाजात दानशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होत आहे.”

मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहोत

     “भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. काही देशांना हे खटकत असले तरी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहोत. त्यांचा विकासदृष्टीकोन, निर्धार आणि जागतिक पातळीवरची प्रतिमा भारताला एक वेगळे स्थान देत आहे. मोदीजींचा वाढदिवस रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्याने साजरा होणे हे खर्‍या अर्थाने देशसेवा आहे,” असे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले.

     ते पुढे म्हणाले की, “आजच्या या उपक्रमात युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. या सर्व उपक्रमाचे श्रेय सुदर्शन डुंगरवाल यांना जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध संस्था, संघटना, व्यापारी व समाजघटक एकत्र आले. रक्तदानातून असंख्य जिवांना नवसंजीवनी मिळेल. यामुळे सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल.”

      या प्रसंगी बोलताना सुदर्शन डुंगरवाल म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा हीच संघटना’ हा संदेश नेहमी दिला आहे. त्याच धर्तीवर आजचे हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदानासारख्या कार्यातून आपण समाजातील गरजू रुग्णांना आधार देऊ शकतो. दानधर्म ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व संस्था, रक्तपेढ्या, संघटना आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

      ते पुढे म्हणाले की, “या शिबिरातून गोळा झालेले रक्त असंख्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रक्तदान ही खरी जीवनदानाची क्रांती आहे. मोदीजींचा वाढदिवस अशा उपक्रमांनी साजरा करणे म्हणजे त्यांच्याच कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहणे होय.”

     रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरामुळे अनेकांना नवे जीवन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. चैत्राली जावळे यांनी केले तर मीनाताई मुनोत यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments