Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarBoudh Samaj Shrirampur | बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी -...

Boudh Samaj Shrirampur | बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी – ॲड. विजयराव खाजेकर


 Boudh Samaj Shrirampur | बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी  देण्यात यावी – ॲड. विजयराव खाजेकर

Boudh Samaj Shrirampur | बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी  देण्यात यावी - ॲड. विजयराव खाजेकर


श्रीरामपूर : दर्शक | (प्रतिनिधी):

लोकसभा असो की विधानसभा असो अथवा नगरपालिका असो प्रत्येक वेळी बौद्ध समाजाला उमेदवारीपासून डावलले जात आहे, यामागे आजपावतो जे काही आमदार,खासदार अथवा नगराध्यक्ष व नगरसेवक झाले त्या सर्वांना निवडून आणण्यामध्ये बौद्ध ,मातंग आणि मेहतर समाजाचा मोठा वाटा आहे, आणी असे असून देखील येथील सर्वच राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक बहुसंख्यांक असलेल्या बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यास गत २५ वर्षांपासून जाणीवपूर्वक केवळ डावललेच नसुन अक्षरशः टाळलेले आहे.

श्रीरामपूर तालुका बाहेरच्या आणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाहेरच्या एका विशिष्ट समाजाला नेहमीच येथील नेतृत्वाने जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्व  दिले हा बौद्ध ,मातंग,मेहत्तर समाजावर अन्याय नव्हे तर काय आहे ?  तसेच या प्रश्नी सर्व राजकीय पक्ष नेतृत्वाला कधी जाणीव होणार आहे का ? असा सवाल देखील नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर यांनी प्रामुख्याने उपस्थित केला आहे.

बौद्ध समाजास नेहमीच डावलले गेल्यामुळे येत्या नगर पालिका निवडणुकी सोबतच पुढे होवू घातलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत देखील बौद्ध समाज आपल्यासोबत राहणार नाही, याची वेळीच दखल घेऊन बहुसंख्यांक असलेल्या बौद्ध समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत बौद्ध समाजास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात यावी असे सर्व राजकीय नेत्यांना ॲड.विजयराव खाजेकर यांनी आवाहन केले आहे.

                                                                                                                           (वृत्त समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर)



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments