Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarVadhu Var Melava | एकल महिलांचा पुनर्विवाह राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा

Vadhu Var Melava | एकल महिलांचा पुनर्विवाह राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा

 Vadhu Var Melava | साऊ एकल महिला समिती व जगदंब फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम 

 Vadhu Var Melava | नगर : दर्शक । – साऊ एकल महिला समिती व जगदंब फाउंडेशन संचलित मराठी सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला व पुरुषांसाठी मोफत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी सोयरीक संस्थेचा हा मेळावा मोफत असून हा मेळावा शनिवार दि २० सप्टेंबर २०२५ संध्याकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने गुगल मीट वर होणार असल्याची माहिती समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे व मराठी सोयरिक संस्थेच्या संचालिका  जयश्री अशोक कुटे यांनी दिली आहे.

पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या एकल महिला, पुरुष व लग्न जमतच नसलेले अविवाहित

       पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या एकल महिला, पुरुष व लग्न जमतच नसलेले अविवाहित मुलांनी या मेळाव्यात भाग  घेण्यासाठी ८४५३९०२२२२ या संस्थेच्या क्रमांकावर १९ सप्टेंबर पर्यंत मोफत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. फक्त नाव नोंदणी करणाऱ्या सदस्यांनाच मेळाव्याच्या दिवशी गुगल मीटची लिंक पाठवण्यात येईल. त्यानंतर त्या लिंकने त्यांना जॉईन होता येणार आहे. वधू वर परिचय  मेळाव्यात त्यांनी स्वतः चा परिचय करून द्यावयाचा आहे. सर्वात महत्त्वाचे  जे पुरुष एकल महिलांच्या मुलांचा लग्नासाठी स्वीकार करण्यासाठी तयार आहेत, अशाच पुरुषांनी मेळाव्यात नाव नोंदणी करावी. जे पुरुष मुलांचा स्वीकार करायला तयार नाहीत, त्यांना मेळाव्यात भाग घेता येणार नाही ही अट आहे. 

     तसेच दोन्ही संस्थेच्या वतीने लग्न करू इच्छिणाऱ्या एकल महिला व पुरुषांसाठी पुनर्विवाह नाव नोंदणी अभियान कायमस्वरूपी चालू आहे ते कधीही वरील नंबर वर संपर्क करून नाव नोंदणी करून घेऊ शकतात. नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना पुनर्विवाहाच्या व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले जाते. त्यात अनेक योग्य ती स्थळे त्यांना पाहायला मिळतात. या पद्धतीने आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात ५७ एकल महिलांच्या पुनर्विवाहाचे लग्न लावण्यात आलेली आहेत. या सर्व लग्नांमध्ये महिलांच्या मुलांचा पुरुषांनी स्वीकार केलेला आहे. साऊ एकल महिला समिती गेल्या ६ वर्षापासून एकल महिलांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करत आहे.

       अशा प्रकारे इच्छुकांनी लवकरात लवकर ८८४७७२४६८० क्रमांकावर १९ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेमार्फत पारुनाथ ढोकळे, मराठासेवक मनोज सोनवणे, नानासाहेब दानवे, सागर मोरे, कल्पना निकम संभाजीनगर, अनिता कांबळे बीड, मयूर बागुल, वनिता हजारे पुणे, नलिनी सोनवणे नाशिक, कविता बोंबले,मंगल काळे खेड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments