Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा  नगर | प्रतिनिधी :  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी काळे यांच्याशी संपर्क … Read more

Ahmednagar Congress | किरण काळेंच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांना मिळाले १ कोटी ८२ लाख रुपयांचे थकीत वेतन

Ahmednagar Congress | कामगारांची दिवाळी होणार गोड, फटाकडे वाजवून गुलाल उधळत कामगारांनी केला एकच जल्लोष अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण … Read more

Ahmednagar Congress: मनपाचे गोलमाल बजेट नगरकरांची घोर निराशा करणारे – किरण काळे

 रु. १५६० कोटींचे अंदाजपत्रक पोकळ ; नगरकरांवर रु. १५० कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट : शहर काँग्रेसचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी) : मीटरने पाणीपुरवठा, उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम, सीएसआर निधीतून कामे यासह कर वाढ न करता मनपाने बजेट जाहीर केले आहे. यावर शहर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. मनपाचे बजेट हे गोलमाल बजेट असून सर्वसामान्य नगरकरांची घोर … Read more

Ahmednagar Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश

Ahmednagar Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश  अहमदनगर (प्रतिनिधी)  : अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक कासम मेमन यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर त्यांनी पक्षात प्रवेश केला.  काही दिवसांपूर्वीच मेमन यांनी राष्ट्रवादीतील आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा … Read more

Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना

 Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना : जिल्हाध्यक्ष किरण काळे  अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिष्टचिंतन केले. थोरात हे महाराष्ट्रातील अत्यंत संयमी, सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन असणारे … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ; व्यापाऱ्यांना केले “असे” आवाहन

 व्यापाऱ्यांना बाजारपेठ दुकाने बंद न ठेवण्याचे काँग्रेसचे आवाहन   Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर … Read more

Ahmednagar Congress: पालकमंत्री, दक्षिण खासदारांनी पंतप्रधान मोदींसह जनतेची फसवणूक केली : किरण काळे

Ahmednagar Congress: शहर जिल्हा काँग्रेसकडून जिल्हा आयुष रुग्णालयाची ईन कॅमेरा पोलखोल Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालयाची शहर जिल्हा काँग्रेसकडून ईन कॅमेरा पोलखोल करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर आरोप काँग्रेसने केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar Congress: नेहरू, गांधीं विषयी खोटी माहिती तरुण पिढीसमोर मांडण्याचा भाजपचा विकृत प्रयत्न – किरण काळे

 Ahmednagar Congress: पं.नेहरू – गांधी जयंती सप्ताहाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजन    प्रतिनिधी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आयर्न लेडी इंदिरा गांधी ही देशाला लाभलेली दोन महान रत्न आहेत. या दोन रत्नांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वामुळेच भारत आज जगात सक्षम राष्ट्र … Read more

Ahmednagar Congress: झेंडीगेट येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रियाझ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

काँगेस मध्ये ईनकमिंग सुरुच… Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): काँगेसमध्ये ईनकमिंगचा सिलसिला सुरुच आहे. प्रभाग १० मधील सामाजिक कार्यकर्ते रियाझ सय्यद ख्वाजा यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहर विकासाचे व्हिजन केवळ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा संविधानाचा विचार आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांसह प्रवेश … Read more