Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे

 Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे                   अहमदनगर(प्रतिनिधी)  – येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड पुष्पा येळवंडे  यांची शिवसेना नगर शहर महिला महिला आघाडीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र मीराताई शिंदे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी अहमदनगर यांनी दिले आहे             पत्रात  म्हटले आहे कि  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते  एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे,सचिव संजय मोरे, मनीषा कायंदे  यांच्या सुचनेनुसार,  आपली शिवसेना पक्षाच्या नगर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.             ॲड. पुष्पा येळवंडे या  सामाजिक कार्यकर्त्या असून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या रणरागिणी,केंद्रीय उपाध्यक्षा  (युनिट राज्य परिवहन महामंडळ) आहेत त्या  किरण पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दिड वर्षात राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी म्हणून कामकाज नगर मध्ये करत आहेत तसेच त्यानी महिला सबलीकरण समिती स्थापन करून गेले ३ वर्षपासून त्याचे कार्य चालू आहे             त्याच्या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख अनिल शिंदे  व बाबूशेठ  टायरवाले,संपर्कप्रमुख सचिव जाधव,ऍड उज्वला भोपळे,मीराताई शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे 

दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती

 दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती     अहमदनगर   – अहमदनगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.      दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेच शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निकवर्तीय … Read more

Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा

Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा   दिल्लीवरून लोकसभा जागांच्या वाटाघाटीसाठी अमित शाह मुंबईला आले आणि  येथे झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही आणि महायूतीच्या जागा भाजप,शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी कोणत्या जागा मिळणार आणि किती जागांवर यांचे उमेदवार असणार याबाबत दिल्लीच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट  झाले … Read more

Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

  Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने भैय्याच्या परंपरेप्रमाणे मराठा संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.   तर यावेळी लेझीम खेळून  आनंद व्यक्त करताना युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौन्दर , नगरसेवक योगीराज गाडे,बाळसाहेब बोराटे आदींसह कार्यकर्ते (फोटो … Read more

Ahmednagar Shivsena: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांमध्ये चेतना जागृत केली – दिलीप सातपुते

 Ahmednagar Shivsena: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन (Photo Prasad Shinde Ahmednagar )     Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी) –  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत, त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. सर्वसामान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृत करुन शिवसैनिक तयार केला आहे आणि तो कधी मोडणार नाही, झुकणारही नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे … Read more

Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे

Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे   ठाणे : भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी … Read more

Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत

Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत जो बायडेनच्या प्रचारालाही उद्या एकनाथ शिंदे जाऊ शकतात कारण ते महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. दुसऱ्या पक्षातून घेऊन २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते  तयार केले.  पण हे तात्पुरते आहेत. एवढंच नाही तर देशाला २०१४ मध्ये पनवती लागली जी २०२४ मध्ये … Read more