मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल   नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.

Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ … Read more