
Chess Competition | क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद मनपा नगर ,नगर बुद्धिबळ संघटना व श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत बलून सोडून श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
उद्घाटन सोहळ्याला नगर मनपाचे आयुक्त यशवंत डांगे , जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, नगर मनपा क्रीडा अधिकारी विन्सेट फिलिप्स , नगर बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, महर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कानडे, उपाध्यक्ष नंदकुमार भावसार, विद्यालयाच्या प्राचार्या तनुजा लोंढे व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत बलून सोडून श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धा 14 वर्षे 17 वर्षे, व 19 वर्षे वयोगट मध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटात 85 मुले व 45 मुलीनी भाग घेतला आहे.17 वर्ष वयोगटात 108 मुले व 31 मुलीनी भाग घेतला आहे तर 19 वर्ष वयोगटात 24 मुले व 13 मुलीनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत 306 मुलांमुली नी भाग घेतला आहे.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे सर बोलताना म्हणाले की, आज राज्य व देशपातळीवर श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलचे अनेक खेळाडू विविध खेळांमध्ये राज्य व देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत . त्यामध्ये सूमैय्या शेख ( फुटबॉल ) श्रावणी भगत ( पिस्तूल शूटिंग ) निकिता रामावत ( फुटबॉल )अमर शेख (फुटबॉल ) व तनिशा शिरसुल ( फुटबॉल ) या खेळाडूंनी श्री साई स्कूल चे नावलौकिक वाढवले आहे.
श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेतून प्रगल्भ खेळाडू घडतील : क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खूरांगे
आज श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळपटू विश्वनाथन व दिव्या देशमुख सारखे नवे खेळाडू घडवेत. बुद्धिबळ खेळामुळे खेळाडूंची एकग्रता ,निर्णय क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, विचार करण्याची धाडसी वृत्ती, खेळाडूंमध्ये वृद्धिंगत होत असते . या खेळामुळे खेळाडू चा आत्मविश्वास वाढीस लागून आत्मबल सुधारते. बुद्धिबळ हा फक्त खेळ नसून मेंदूला धार लावणारे विज्ञान आहे. त्यामुळे श्री साई करंडक बुद्धिबळ स्पर्धेतून प्रगल्भ खेळाडू घडतील असा आशावाद जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खूरांगे यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी श्री साई करंडक व रोख रक्कम 1000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी रोख रक्कम 701 रुपये तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी व रोख रक्कम 501 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी ट्रॉफी रोख रक्कम 301 रुपये व पाचव्या क्रमांकासाठी ट्रॉफी रोख रक्कम 201 रुपये ठेवण्यात आले आहे.
पहिल्या दिवस अखेर 14 वर्षे वयोगटात मुलीमध्ये तनिष्का मेहेत्रे ,मंडलेचा मुलांमध्ये मेहेत्रे दक्ष,अनय महामुनी 17 वर्षे वयोगटात मुलीमध्ये शर्वरी सांगळे,जामगावकर इर्षता व मुलांमध्ये हर्ष घोडके,चोरडिया ईशान तर 19 वर्षे वयोगटात मुलीमध्ये सायमा मिर्झा, व मुलांमध्ये इंगळे श्रीराज ,भोर कृष्णा हे विद्यार्थी आघाडीवर होते
यावेळी अनेक पालक व क्रीडा क्षेत्रातील क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मल्होत्रा व आभार शरद दारकुंडे यांनी मानले.
