Chichondi Patil | चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवडा संपन्न

Chichondi Patil | चुल पेटवून या ऑगस्ट क्रांती, पंधरवडा,ग्रामस्वराज्य अभियानास सुरुवात
Chichondi Patil | नगर : दर्शक ।
चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली “ऑगस्ट क्रांती पंधरवडा” मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.1 ऑगस्ट रोजी सरपंच शरदभाऊ पवार यांनी गावातील महिला भगिनी व अंगणवाडी सेविकांच्या हस्ते व गावातील आजी-माजी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक तरुण सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये चुल पेटवून या ऑगस्ट क्रांती, पंधरवडा,ग्रामस्वराज्य अभियानास सुरुवात केली,
यामध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कृषी,आरोग्य,महसूल,महिला बालकल्याण,शिक्षण,ग्रामस्वच्छता यासह अनेक विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना बोलवून गावात थेट योजना राबवून ग्रामपंचायत व योजनांचे 2 कोटी 11 लक्ष रुपयांच्या कामांचे थेट उद्घाटन करून कामाला सुरुवात केली व गावच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा.
Chichondi Patil |नव्याने वाढलेल्या लोक वस्तीतही ग्रामपंचायत व विविध योजनांचा फायदा मिळणार

यासह अनेक ग्रामविकासाच्या दिशेने विविध उपक्रम राबवले जात असून, या अभियानातून गावचा सर्वांगिक विकास होत आहे व म्हसोबावाडी, खंडोबा नगर, रेणुका नगर, गराडी वस्ती, तळेवाडी, पवार पट्टा रोड, या नव्याने वाढलेल्या लोक वस्तीतही ग्रामपंचायत व विविध योजनांचा फायदा मिळणार आहे, या ग्रामस्वराज्य अभियानाला गावातून नागरिक महिला भगिनी विविध संघटना तरुण मंडळी यांचाउत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑगस्ट रोजी निर्मल ग्रामस्वच्छता अभियान राबवले गेले.संपूर्ण गावात स्वच्छतेचा संदेश देत, शाळा, अंगणवाडी,मंदिरे, बाजारतळ, अमरधाम (मोतीबाग) व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि जनजागृती मोहिमा पार पडल्या. ग्रामपंचायत सदस्य,शालेय विद्यार्थी, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका,ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांच्याकडून घरोघरी 2000 डस्टबिन कचराकुंड्या वाटप करण्यात आल्या.
2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण क्रांती दिन साजरा
2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण क्रांती दिन साजरा करण्यात आला. गावातील वृक्षप्रेमींची वृक्ष संवर्धन समिती तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध ठिकाणी व शाळा अंगणवाडी येथे स्थानिक नारळाचे व वडाचे झाडे लावण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषवाक्याखाली ग्रामस्थांनी हिरवळ वाढवण्याचा संकल्प केला. यामध्ये मोतीबाग परिसरात अनेक ग्रामस्थानी वाड वडिलांच्या स्मरणार्थ वृक्ष आणि बाकडे यांचे दान केले.
3 ऑगस्ट रोजी जनकल्याण दिन साजरा करण्यात आला. तालुका पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांना थेट गावात बोलून शासनाच्या विविध गरीब कल्याणकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये शीधापत्रिकेद्वारे मिळणारे धान्याच्या अडीअडचणी सोडवण्यात आल्या, नवीन 99 गरजवंतांना धान्य सुरू करून दिले,तर रेशन कार्ड संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी त्याच्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे.
Chichondi Patil | 4 ऑगस्ट दिवशी कृषी व पशुविकास दिन मोठ्या प्रमाणात साजरा
4 ऑगस्ट दिवशी कृषी व पशुविकास दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सरपंच शरदभाऊ पवार व सभापती प्रवीण दादा कोकाटे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांच्या शेतांवर, बांधावर जाऊन थेट भेट देण्यात आली. कृषी मंडळ अधिकारी गीते साहेब,कृषी सहाय्यक व पशुवैद्यकीय डॉक्टर अनिल गडाख यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माती परिक्षण, पीक मार्गदर्शन केले व समृद्धी डेअरी फार्म परकाळे वस्ती येथे जनावरांचे लसीकरण व उपचार याचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे अर्ज थेट त्यांच्या शेतावर जाऊन भरून घेण्यात आले,
5 ऑगस्ट रोजी संजय गांधी निराधार योजना व डाक पोस्ट विभागासंदर्भात ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली व विधवा व वयस्कर महिला यांना डोल सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व पोस्ट विभागातील अधिकारी देउतकर यांनी मार्गदर्शन करून योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
आयुष्यमान भारत योजना कॅम्प आरोग्य शिबीर
6 ऑगस्ट आरोग्य क्रांती दिन साजरा करून आयुष्यमान भारत वंदना योजना कॅम्प आरोग्य शिबीर नेत्र तपासणी करून गावातील 200 ग्रामस्थांना या आरोग्य दिनानिमित्त आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले व 15 नेत्र रुग्णांना ऑपरेशन साठी नगरला पाठवून दिले यावेळी महात्मा गांधी जन आरोग्य योजनेचे डॉक्टर व अधिकारी यांचे व गावातील डॉक्टर महेश कोकाटे यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या स्वच्छता व आरोग्य विषयी मोहिमेवर मार्गदर्शन मार्गदर्शन करून ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचाऱ्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.
या विविध योजना राबवल्यामुळे संबंधित प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ झाला.असा नवीन उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे अशी परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतचे विविध योजनांची लोकार्पण
अजून पुढील दिवसात डिजिटल सेवा, महसूल क्रांती दिन,ऑगस्ट क्रांती दिन,महिला बालकल्याण विकास दिन , विद्यार्थी पालक शिक्षण दिन,ग्रामपंचायत स्थापनादिन,महाश्रमदान दिन,भव्य दिव्य स्वातंत्र्य दिन अशा विविध दिनाच्या माध्यमातून 100% मतदार नोंदणी अभियान,
100% आयुष्यमान भारत कार्ड काढणे अभियान, स्वच्छता वृक्षारोपण घरोघरी डस्टबिन वाटप, महिला व बालकल्याण संदर्भात विविध योजना सर्व चौक व अंगणवाडी येथे सीसीटीव्ही बसवणे, दोन्ही शाळेमधून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवस सरपंच निवडणे व ग्रामपंचायत चे विविध योजनांची लोकार्पण,
गावातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे नाव, मोबाईल नंबर, कार्यालयीन कामकाज वेळ, वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याचे नंबर, याबाबत तक्रार पेट्या, शासकीय कार्यालयाचे दिशादर्शक बोर्ड,
अनेक वर्षापासूनच्या विविध प्रलंबित प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा व गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी यांचा व शाळा अंगणवाड्या स्कूल 14 ऑगस्ट रोजी महा श्रमदान साजरा दिन करून आपल्या परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे व या सर्व दिनाच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.
