देशासाठी चर्चमध्ये 100 दिवस उपवास व 100 तास नॉन स्टॉप प्रार्थना
अहमदनगर (प्रतिनिधी) |
-येथील स्टेशन रोडवरील कोठी येथील एनटीपीएच सिटी चर्च मध्ये पास्टर दीपक थोरात व असंख्य खिस्ती बांधवांनी भारत देशासाठी 9 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत100 दिवस सुरू असलेल्या उपवासाचे प्रार्थनेची सांगता निमित्त ११ ते १५ ऑगस्ट पर्यंत 100 तास नॉन स्टॉप प्रार्थना करण्यात आली,त्याची सांगता चर्चमध्ये विविध कार्यक्रम आयोजन करून,राष्ट्रगीत,तिरंगा फडकावून व आकाशात शांततेचे प्रतीक असलेले कबुतरे सोडून करण्यात आली
यावेळी आयोजक पास्टर दिपक थोरात,प्रमुख वक्ते पास्टर डेव्हीड गायकवाड,पुणे, पास्टर केदारी, संगमनेर,सुरेंद्र भाऊ थोरात,बिशप तानाजी पाडाळे,बिशप शॅमुवेल भिंगारदिवे,नगरसेविका रुपाली कदम,रूपसिंगदादा कदम,पास्टर ईश्वरदास इंगळे,पास्टर आजय डाके,पास्टर राजु खोतकर पास्टर डेविड ठोकळ,पास्टर सुरेश पंडीत, संदीप वैरागर,राहुल वैराळ,अक्षय गायकवाड,चेतन बनसोडे,स्वयम साळवे,जय ससाणे,अभिषेक डहाणे,यश थोरात आदींसह चर्च सभासद व खिस्ती लोक उपस्थित होते.
पास्टर दिपक थोरात म्हणाले पंतप्रधान,राष्ट्रपती, सैनिक व सर्व भारतवासीयांच्या सुख व समाधानासाठी व देशात शांतता राहावी यासाठी हा उपवास केला गेला,असा उपक्रम देशात कोठेही झाला नसेल, तसेच या उपक्रमात यूट्यूब च्या माध्यमातून सुमारे दीड लाख लोक हे प्रार्थना ऐकत होतेव सहभागी झाले होते.
पास्टर डेव्हीड गायकवाड म्हणाले पास्टर दिपक थोरात यांचा उपक्रम कौतुक करण्यासारखा आहे अशी सलग १०० तास प्रार्थना देशासाठी प्रथमच पास्टर यांनी केलीअसेल.यासाठी मी त्यांचे व त्याचे सहयोगी याना धन्यवाद देतो.
यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली,मुलांनी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर राष्ट्रगीत,तिरंगा फडकावून व आकाशात शांततेचे प्रतीक असलेले कबुतरे सोडण्यात आली व भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली