Crime News: हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
अहमदनगर :ज्येष्ठ लेखक तसेच निर्भय बनो आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांना यश आले आहे.बातमीतील हकीगत अशी की,दि.०७ ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्यादी हेरंब रामचंद्र कुलकर्णी रा.बालाजी चेंबर्स,श्रमीकनगर,सावेडी,
अहमदनगर हे व त्यांचे मित्र मोटारसायकलवरुन जात असतांना तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येवुन फिर्यादीचे मोटारसायकल अडवुन फिर्यादी व साक्षीदार यांना लोखडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले होते.
त्याबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १४७४/२०२३ भादवि कलम ३०७,३२४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस ठाणे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन अटक करणेबाबत आदेश दिलेले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार,बापुसाहेब फोलाने,दत्तात्रय गव्हाणे,दत्ता हिंगडे,पोना/लक्ष्मण खोकले, विशाल दळवी,रविंद्र कर्डीले, सचिन अडबल,संतोष खैरे,विशाल गवांदे,विजय ठोंबरे, पोकॉ/सागर ससाणे,रविंद्र घुंगासे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोसई/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोना/अविनाश वाकचौरे,पोकॉ/शिरीश तरटे, पोकॉ/सतिष भवर यांचे पथक तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर शहरातील गुन्हा घडले ठिकाणचे तसेच,निलक्रांती चौक,पत्रकार चौक,प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको,जोशी क्लासेस येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज प्राप्त करुन सदर फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करता सदरचा गुन्हा हा चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा,अहमदनगर याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याने निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की,
त्याचा मित्र अक्षय विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी असुन सदर पानटपरी ही अतिक्रमणामध्ये येत असल्याने हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांनी पानटपरी काढणेबाबत महानगरपालीका येथे अर्ज दिल्याने सदरची पानटपरी काढण्यात आलेली होती. त्याचा राग मनात धरुन १) अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरुन २) चैतन्य सुनिल सुडके रा.सुडके मळा,अहमदनगर, ३) अक्षय पुर्ण नांव माहित नाही, ४) सनि जगधने, ५) एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळून केला असल्याचे सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेता इसम नामे १) अक्षय विष्णु सब्बन दातरंगे मळा,विटभट्टीजवळ, ता. जि. अहमदनगर, २) चैतन्य सुनिल सुडके सुडकेमळा, अहमदनगर, ३) एक विधीसंघर्षीत बालक असे मिळुन आले असुन इसम नामे ४) अक्षय पुर्ण नांव माहित नाही (फरार) ५) सनि जगधने पुर्ण नांव पत्ता माहित नाही (फरार) यांचा शोध घेता ते मिळुन आलेले नाही. मिळुन आलेल्या इसमांना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हज़र केले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहोत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.