Delhi Gate | दिल्लीगेटच्या जिव्हेश्वर मंदिरात हनुमान चालीसा व भजन संध्या संपन्न
Delhi Gate | नगर : दर्शक ।- संजय सागावकर व नरेश दुस्सा मित्र परिवार तसेच जिव्हेश्वर मंदिरच्या वतीने दिल्लीगेट पटांगण येथील जिव्हेश्वर मंदिराच्या प्रांगणात मंगल भक्त सेवा मंडळाचा सामुहिक हनुमान चालीसा पाठ संपन्न झाली व भजन संध्याने राम नामाने परिसर दुमदुमन गेला होता
हनुमान चालीसाच्या गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले.तर नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व भजन संध्यातभाविक तल्लीन झाले होते. हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाची हनुमानाची पूजा आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली
संजय सागावकर म्हणाले गेली अनेक वर्षे सतत या ठिकाणी हनुमान चालीसा आम्ही आयोजित करत असून त्यामुळे भाविकांमध्ये व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आयुष्य जगण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते व अध्यात्माची गोडी लागते,युवक मंडळी यामुळे अध्यात्माकडे वळतात
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रभागातील हजारो नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली