भगवान जिव्हेश्वर मिरवणुकीचे दिल्लीगेटला भव्य स्वागत

नगर : दर्शक ।
साळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सव निम्मित शहरात काढण्यात आलेली मिरवणूक दिल्लीगेट येथील भगवान जिव्हेश्वर मंदिरात आल्यावर मोठया उत्साहात वाद्याच्या गजरात व आतिषबाजी करून करण्यात आले स्वागत करण्यात आले होते अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय सागावकर यांनी दिली
दिल्लीगेट परिसरातील जिव्हेश्वर युवक मंडळाच्या वतीने मंदिरात जन्मोत्सव संपन्न झाला दिवसभर मोठया संख्नेने भाविक दर्शनाला आले होते भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सव निम्मित शहरात सर्जेपुरा,तेलीखूट,चितळेरोड,दिल्लीगेट मार्गे काढण्यात आलेली मिरवणूक दिल्लीगेट मंदिरात आल्यावर स्वागत व महाआरती करण्यात आली
