Delhigate Nagar : दिल्लीगेटला भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव संपन्न

Delhigate Nagar |नगर : दर्शक ।
स्वकुळसाळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सवास दिल्लीगेट येथील भगवान जिव्हेश्वर मंदिरात मोठया उत्साहात पहाटे साजरा करण्यात आला ,त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नेते संजय सागावकर यांनी दिली.
दिल्लीगेट परिसरातील जिव्हेश्वर युवक मंडळाच्या वतीने जन्मोत्सवाला २६ वर्षे वर्ष झाले आहे. जन्मोत्सव निम्मित पहाटे ६ वा.डॉ आदित्य व सौ सायली खडामकर यांचे हस्ते भगवान श्री जिव्हेश्वर मुर्तीस अभिषेक,आरती,पाळणा,गायन होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर दररोज दुपारी ४ वा विविध भजनी मंडळांचे भजने व भगवान जिव्हेश्वर पोथीवाचन सांगता झाली.
दिवसभर मोठया संख्नेने भाविक दर्शनाला येत होते कार्यक्रम यशश्वीतेसाठी जेष्ठ नेते संजय सागांवकर, मंदिर कार्यकारणी चे नितीन पावले,राजेंद्र सवई,सचिन क्षीरसागर,सचिन पावले, मुकुंद सावेकर रोहित सावेकर,संतोष सावेकर,,सागर सावेकर,योगेश मानकर ,सचिन मानकर, गणेश सवई ,सौरभ सावेकर ,महिला मंडळाच्या संस्थापक शैला मानकर,अध्यक्षा वनिता मानकर,उपाध्यक्ष अनिता सवई सचिव कल्याणी पावले आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.
