Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळात चर्चा फक्त निवडणुकीची

 Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती   

Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती


                   Diwali Faral: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सध्या जिल्हात विविध ठिकाणी फराळाचा कार्यक्रम नेत्याकडून,पदाधिकाऱ्या कडून आयोजित केले जात आहे त्यातील अनेक जन आमदारकी व खासदारकी साठी इच्छुक उमेदवार आहे नगर मधील राजकारण हे सोधा पक्षाचे आहे हे सर्वच प्रमुख नेते मान्य करतात परंतु आता विरोधकांचा विरोधक तो आपला मित्र याप्रमाणे सध्याचे वातावरण आहे फराळाच्या निम्मिताने विरोधकांची मोट बांधण्याचे काम चालू आहे त्यातच आता उघडपणे चर्चा चालू आहे.

 

            शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमानिमित्त अशा राजकीय  टिपण्ण्या ऐकावयाला मिळाल्या.प्रा.शशिकांत गाडे यांनी वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळाचे आयोजन केले होते.यावेळी जिल्हाभरातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पागोष्टी रंगल्या.शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडेंचे सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

              यावेळी माजी मंत्रीभाजप नेते प्रा.राम शिंदे,माजी आमदार विजय औटी,आमदार नीलेश लंके,भाजपचे  भैय्या गंधेसुवेंद्र गांधीसंपतराव म्हस्केबाबासाहेब गुंजाळ,राजेंद्र नागवडेघनश्याम शेलारभगवान फुलसौंदर,साजन पाचपुते,अभिषेक कळमकरअनिल शिंदेदिलीप सातपुतेसंभाजी कदम,राजेंद्र नागवडेसंदेश कार्लेप्रवीण कोकाटेशरद पवारबाळासाहेब हराळबाबासाहेब खसेंधनंजय म्हस्केनंदू पालवेभाऊसाहेब काळेसंदीप कर्डिलेरोहिदास कर्डिलेबाबासाहेब गुंजाळ ,अभिषेक भगत,किरण काळे आदींसह नगर शहरनगर तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील नेतेकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


              नगरसेवक योगीराज गाडे व उद्योजक रमाकांत गाडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी अनेकांनी प्रा गाडे याना  वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबर आमदारखासदार होवोत अशाही शुभेछया दिल्या.