Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

 

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प




अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काल अमेरिकेत मतदान झालं होतं. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत. 


अमेरिकेत निवडणुकीच्या मतदानाआधी FBI अलर्ट होतं. निवडणुकीत असलेला धोका लक्षात घेऊन FBI ने कमांड पोस्ट बनवली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये इलेक्शन कमांड पोस्ट बनवण्यात आली आहे.


80 जणांचा स्टाफ 24 तास निवडणूक घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. वोटिंगआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता. “आपण एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. मला आशा आहे, आता जे काही होईल, ते चांगलं होईल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल तोच विजय” असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.



अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनियासोबत समर्थकांमध्ये पोहोचले आहेत. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. 47 वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.



लोकांनी अमेरिकेत परत आलं पाहिजे पण कायदेशीररित्या. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खास आणि महान आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्कच कौतुक केलं. “मस्क कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करुन दाखवलं, ते रशिया करु शकतो का?. चीन करु शकतो का?. कोणी अन्य असं करु शकत नाही” त्यांनी स्पेस एक्सच्या लॉन्चच सुद्धा कौतुक केलं. अमेरिकन बॉर्डर सुरक्षित करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा मांडला