Dr Paulbudhe College: कॉलेज जीवनातील आनंदा बरोबरच करिअर घडविणे महत्वाचे – आर.डी.बुचकुल

 Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे डी.फार्मसीमध्ये फ्रेशर पार्टीतून नवगतांचे स्वागत

Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे डी.फार्मसीमध्ये फ्रेशर पार्टीतून नवगतांचे स्वागत


    Dr Paulbudhe College: अहमदनगर (प्रतिनिधी) –  पहिली ते पाचवी पर्यंत शालेय जीवनात शाळा, पुस्तके, शिक्षक यांची ओळख होते. 10 वी पर्यंत शिकतांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणाचे महत्व कळते. 10 वी, 12 वी ही वर्षे पुढील शिक्षणाची दिशा ठरविणारी असतात. 


कॉलेज जीवनात आपण वेगळ्या वातावरणात येतो. मौज, मस्ती, आनंदाचा बहर येतो, या आनंदाबरोबरच पुढे आपले करिअर घडविणे महत्वाचे असते. कॉलेज जीवनातील सहकारी हे कायम आपल्या स्मरणात राहत असतात. त्यांच्याबरोबर घालविले क्षण आणि विचारांची देवाण-घेवाण जीवनात उपयोगी पडते, असे प्रतिपादन सेवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आर.डी.बुचकुल यांनी केले.


     वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ डी फार्मसीच्या फ्रेशर पार्टीतून नवगतांचे स्वागत समारंभ पार पडला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आर.डी.बुचकुल, सेक्रेटरी आर.ए.देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, संचालक साई पाउलबुधे, कॅम्पस इंन्चार्ज डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


     श्री.बुचकुल पुढे म्हणाले, सध्याचा काळा हा स्पर्धेचा आहे. यामध्ये टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. जीवनातील आनंदी क्षणाबरोबरच भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.


     प्रास्ताविकात प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने नव्याने प्रवेश घेतलेल्या नवगतांसाठी स्नेहपूर्ण वातावरण निर्माण होते, असे सांगितले.


     मिस्टर अ‍ॅण्ड मिस फ्रेशर यांची निवड करण्यासाठी गायन स्पर्धा, विविध कला-गुणांचा अविष्कार विद्यार्थ्यांनी यावेळी दाखविला. या फ्रेशरमधून अनंता गोरे यांची मिस्टर फ्रेशर म्हणून तर मिस फ्रेशर म्हणून मोमीन इफ्रा यांची निवड करण्यात आली. या दोन्ही विद्याथ्यांना मिस्टर फ्रेशर, मिस फ्रेशर सन्मान देण्यात आला. सर्वांनी त्यांचे स्वागत केले.